Sanjay Raut On Devendra Fadnavis | ‘अमृता फडणवीसांनी गुपित फोडलं नसतं तर…’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Devendra Fadnavis | बंडखोरीचा जबर धक्का बसल्यानंतर आता शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) सर्वच नेते बंडखोरांना आणि भाजपाला (BJP) रोज शाब्दिक फटकारे लगावत आहेत. यामध्ये शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) सुद्धा दररोज बंडखोरांना सुनावण्यात येत आहे. आजच्या सामनाच्या ‘रोखठोक’ सदरामधून शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader And MP Sanjay Raut) यांनी पुन्हा शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजपावर टिकास्त्र सोडले आहे. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

 

‘रोखठोक’ सुनावताना राऊत यांनी म्हटले आहे की, शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता सौ. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीच घरातले गुपित फोडले. अमृता यांनी गुपित फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

 

या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत. काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय ? याचाही खुलासा व्हायला हवा.

 

संजय राऊत यांनी या लेखात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा.

फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत. बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे ? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना ? प्रजेला काय समस्या आहेत ? आपले राज्य नीट चालले आहे ना ? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना ? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी.

 

हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता.
‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत.
त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार ?

 

काळ्या पैशांचा महापूर कसा आला ते महाराष्ट्रातील सत्तांतरात दिसून आले.
गुवाहाटीच्या झाडाझुडपांचे वर्णन करणारे आमदार शहाजी पाटलांचा एक डायलॉग सध्या गाजतो आहे.
त्या पार्श्वभूमीवर जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मारलेला ‘पंच’ त्याहून जास्त चमकदार आहे.

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्के!’ येथे थोडा स्वल्पविराम मारून आमदार गोरंट्याल पुढे म्हणतात,
‘पचास खोके… पक्के !’ एकदम ओक्के !’ या सगळ्यांची उघड चर्चा आता लोकांत सुरू आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आमचीच, असे सांगणार्‍यांचे आत्मे या खोक्यांत बंदिस्त आहेत, असे गोरंट्याल सांगतात ते खोटे नाही.

 

गुवाहाटीस गेलेल्या आमदारांची ‘रेडा’ अशी हेटाळणी केली म्हणून ते नाराज झाले व त्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडल्याची बतावणी सुरू आहे हा गैरसमज आहे.
‘टोणगा’ हा वाकप्रचार आपल्याकडे सर्रास वापरला जातो. अत्रे-ठाकरे यांनी ते जाहीर सभांतून वापरले आहे.
रेडा हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे. इतर देवतांप्रमाणे मृत्युदेवता, यमदेवता आहे. त्या देवतेचे वाहन रेडा आहे.
शंकराच्या नंदीइतकेच रेड्यालाही हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे हे नवहिंदुत्ववादी विसरलेले दिसतात.
ज्ञानेश्वरांनी ‘वेद’ म्हणवून घेण्यासाठी रेड्याचीच निवड केली.

 

Web Title :- Sanjay Raut On Devendra Fadnavis | shivsena leader and mp sanjay raut slams bjp devendra fadnavis over eknath shinde revolt maharashtra political situation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा