अर्थसंकल्पीय अधिवेशन : विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला सावरकर गौरव प्रस्ताव, सभागृहात गदारोळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सावरकरांच्या गौरव प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजपनं लावून धरली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांत सावरकरांबद्दल परस्परविरोधी भूमिका असल्यानं गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर शिवसेना काय भूमिका घेणार ?, याकडेही सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपच्या सदस्यांनी सभागृहात फलक झळकावून यावेळी निषेध दर्शविला आहे. दरम्यान, यावेळी मराठी सक्तीचं विधेयकही सरकारकडून आणलं जाण्याची शक्यता आहे.

अपडेट :
विधानसभा अध्यक्षांनी सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळला. तर ‘केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिलं गेलं नाही ?’ त्यामुळे सावरकरांच्या माध्यमातून भाजपचा नेमका स्वार्थ काय हेच कळत नाही ? अजित पवारांचा सवाल.

सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांचा अपमान करणाऱ्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालण्याची फडणवीसची मागणी.

सभागृह नियमाप्रमाणं चालतं. कामकाज सल्लागार समिती असते. अध्यक्ष असतात. एखादा विषय ऐनवेळीही घेता येतो, त्यामुळे चांगल्या व्यक्तीच्या संदर्भातील चर्चेवर कुणाला आक्षेप असण्याची हरकत नाही – अजित पवार

हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही, सावरकरांचं योगदान कुणाला नाकारता येणार नाही – अजित पवार

महिलांवरील अत्याचारांच्या विषयावर सरकार गंभीर नाही, गुन्हेगारांकडं अ‍ॅसिड, पेट्रोल कुठून येतं?, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल.

भाजप सरकारला कोंडीत पकडून शकत नाही. एवढी ताकदच त्यांच्यात नाही, महापुरुषांचा गौरव करण्याबद्दल काही नाही. पण भाजपनं त्यावरून राजकारण करणं टाळावं – बच्चू कडू

You might also like