Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ८ तरुणांकडून पैसे घेऊन त्यांची ११ लाख ३० हजार घेऊन फसवणूक (Cheating Case) करणार्‍या बीपीओचालकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

श्रीकांत बालाजी बिरादार (वय ३०, रा. लिलियन अपार्टमेंट, वाकड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरीतील (Pimpri News) एका २८ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार बालेवाडी हायस्ट्रीट येथील फ्रेशहर जॉब हॅटमध्ये मार्च ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत बिरादार याचा फ्रेशहर जॉब हंट हे तरुणांना स्पेसमेंट देणारे कार्यालय आहे. तो बीपीओ कंपन्यांमधील जॉब तरुणांना देत असे. त्याच्याकडे बंगलोर येथील कंपनीचे काम होते. तेथील कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून त्याने ८ जणांकडून ११ लाख ३० हजार रुपये व मुळ कागदपत्रे घेतली होती.
त्यापैकी काही पैसे बंगलोरमधील कंपनीला दिले होते. परंतु, त्यानंतर या कंपनीने काम देणे बंद केले.
त्यामुळे बिरादार या मुलांना काम देऊ शकला नाही.
चतु:श्रृंगी पोलिसांनी बिरादार याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | 11 lakh fraud by 8 people by pretending to be a job; BPO driver arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा