Maharashtra Cabinet Decision | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शाळांचं (school) पूर्ण स्वरूप बदलणार आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) पीएमश्री योजना (PM Shri Yojana) महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला आहे.

प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया (Pradhan Mantri Schools for Rising India) महाराष्ट्रात राबवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबतं सुरू होती. केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Cabinet Decision)

काय आहे ही योजना?

– या योजनेत सुरु करण्यात येणाऱ्या शाळेत नवीन तंत्रज्ञान (New Technology), स्मार्ट क्लास (Smart Class), खेळ (Sports) आणि आधुनिक सुविधा (Modern Facilities) यावर विशेष लध दिले जाणार आहे.
– शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे (Literacy) प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
– विद्यार्त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही उपाययोजना सुचवल्या जातील.
– राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy) या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल.
– केंद्राच्या या पादर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे.
– वास्तविक जीवनाशी निगडित प्रकल्पांची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे.
– ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, स्मार्ट क्लास, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा अत्याधुनिक सोयी व सुविधा या योजनेत असणार आहेत.

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | shinde government decided to implement of pm school for rising india know in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना