Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एक तास चर्चा झाली. मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे अंतिम करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) स्वच्छ नेत्यांनाच संधी देण्याबद्दल शिंदे आणि फडणवीस यांचे एकमत झाले आहे.

 

स्वच्छ नेत्यांनाच संधी दिली जाणार असल्याचे शिंदे-फडणवीस यांनी ठरवल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार (Former Minister Abdul Sattar) यांचे मंत्रिपद हुकणार असल्याची चर्चा आहे. राजकीय गोटात अशीही चर्चा आहे की, भाजपाला (BJP) सत्तार नको असल्यानेच स्वच्छ नेत्याची अट आज जाणीवपूर्वक जाहीर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी (Maharashtra Cabinet Expansion) शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात (Maharashtra TET Scam) माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव समोर आल्यानंतर ताबडतोब या हालचाली झाल्या आहेत.

 

सत्तार यांच्यासोबत आणखी काही जणांचा पत्ता कापला जाऊ शकतो. शिंदे यांच्या गटाला फारशी महत्त्वाची खाती दिली जाणार नाहीत. अर्थ, गृह, महसूल यांच्यासारखी महत्त्वाची खाती भाजपकडे असतील. पैकी महसूल मंत्रालय (Ministry of Revenue) मिळवण्यासाठी शिंदे आग्रही आहेत. पहिल्या टप्प्यात पंधरा ते आठरा जणांचा शपथविधी होऊ शकतो. भाजपकडून अकरा ते बारा, तर शिंदे गटातील पाच ते सात जणांना संधी मिळू शकते.

नऊ माजी मंत्र्यांना पहिल्या टप्प्यात संधी द्यावी, अशी शिंदे यांची इच्छा होती. कारण शिवसेनेतील बंडात नऊ मंत्र्यांनी त्यांना साथ दिली होती. यातील दोन ते तीन जणांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद आता दिले जाणार नाही. यामध्ये अब्दुल सत्तार यांचे नाव असू शकते.

 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगदी अगोदरच शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव समोर आल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामधील सर्व अपात्र लोकांनी पात्र होण्यासाठी पैसे दिले होते.
मात्र अपात्र उमेदवारांना पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते.
या उमेदवारांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उजमा यांची नावे असल्याचे समजते.
या दोघींचीही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता