Maharashtra Cabinet Expansion | सत्तांतराच्या नाट्यानंतर 40 दिवसांनी महाराष्ट्राला मिळाले 20 कारभारी, जाणून घ्या शिंदे-फडणवीसांच्या ‘शिलेदारां’ बाबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | ठाकरे सरकारला (Thackeray Government) पाय उतार करुन सत्ता स्थापन केलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) अखेर 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार आज सकाळी पार पडला आहे. यात शिंदे गटाकडून (Shinde Group) 9 तर भाजपकडून (BJP) 9 जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून टीका होत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाल्याने काहीशी उसंत मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

 

शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये

1. पहिल्या विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) फडणवीस आणि शिंदे गटाच्या 9-9 आमदारांना शपथ

2. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.

3. बंडखोरीनंतर आक्रमक चेहरा म्हणून समोर आलेल्या औरंगाबादच्या संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना पहिल्या विस्तारात स्थान देण्यात आलेले नाही. विस्तारा पूर्वी पार पडलेल्या बैठकीत शिंदे आणि शिरसाट यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाल्याचे समोर आले होते.

4. TET घोटाळ्यात नाव आल्यामुळे चर्चेत आलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे नाव शेवटच्या क्षणी घेण्यात आले. त्यांच्या शपथविधीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

5. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) नाव आलेले आणि भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.

6. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले तानाजी सावंत (Tanaji Sawant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) या सेनेच्या माजी मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश

7. काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना देखील मंत्रीपद देण्यात आले. तसेच पहिली शपथ घेण्याचा मानही त्यांना देण्यात आला.

8. भाजपकडून औरंगाबादचे आमदार अतुल सावे (Atul Save) हा नवा चेहरा मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आला.

9. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे (Dada Bhuse), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) या विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी.

 

Web Title : –  cm eknath shinde devendra fadnavis shiv sena bjp government cabinet expansion today maharashtra cabinet expansion

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा