Maharashtra Cabinet Expansion | ‘पहिल्यांदा आरसा पाहावा आणि त्यानंतरच…’ सुप्रिया सुळेंच्या टीकेला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज सकाळी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपच्या (BJP) एकूण 18 जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. मात्र पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी (Pooja Chavan Death Case) मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांना नव्या सरकारने पुन्हा मंत्री केले आहे. यावरुन शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी निशाणा साधला आहे. परंतु यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला आहे. सर्व सक्षम मंत्री आहेत, लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. जे विनाकारण आरोप करत आहेत त्यांना हे उत्तर आहे. खातेवाटप लवकरच केले जाईल, असं सांगत संजय राठोड यांच्या विषयावर याआधीच मुख्यमंत्र्यांनी (CM) स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पुरेसे आहे, असे सांगत यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं.

 

महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार

महिलांना मंत्रिपद दिले नाही, हा जो आक्षेप आहे, तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. मागील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात पाच मंत्री घेतले होते, तेव्हा कोणत्या महिलेला स्थान दिले होते, असा उलट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

 

सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर खटले चालू असतील.
अशा पक्षाला अशी टीका करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, हा माझा प्रश्न आहे.
त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा आरसा पाहावा आणि त्यानंतरच अशा प्रकाराचे ट्विट करावे,
असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना दिले आहे.

 

Web Title : –  Maharashtra Cabinet Expansion | deputy cm devendra fadnavis first reaction on cabinet expansion and sanjay rathod oath

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा