Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू?, CM शिंदेंसमोर मोठा पेच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ (Ministerial Oath) घेतल्यानंतर पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागणार का, याची उत्सुकता शिवसेना (Shivsena) भाजपच्या आमदारांना (BJP MLA) लागली आहे.

 

राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने आता पालकमंत्री (Guardian Minister) पदाची माळ गळ्यात पडते की नाही, याची वाट बघत आहेत. या मंत्रिमंडळात 14 मंत्र्यांचा समावेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने शिवसेना आणि भाजपमधील काही आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लांबवणीवर जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) आहे.

 

शिवसेना शिंदे गटातील (Shinde Group) चार ते पाच आमदारांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामावर केंद्रातील नेते नाराज आहेत. त्यामुळे या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याच कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील 40 आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यातच काही आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील दबाव वाढला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील होण्यापूर्वी शिंदे गटाला 12 ते 13 मंत्रिपद आणि महामंडळ मिळण्याची शक्यता होती. मात्र आता सत्तेत तीन पक्ष आल्याने ती शक्यता धूसर झालेली आहे, हे आमदारांना कळून चुकल्याने शिंदे गटात नाराजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नऊ जाणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. आता आपल्या पक्षातील आमदारांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यशस्वी होतात का? हे लवकरच समजेल.

दरम्यान, ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले,
अजित पवारांसोबत आठ मंत्र्यांनी शपथ घेतली, मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाही.
खरंतर शपथ घेतल्यानंतर 24 तासात खातेवाटप करण्याची परंपरा आहे. अजित पवार,
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), धनंजय मुंडे (Dhananjay Munde)
असे टोलेजंग आठ दिवस खाते वाटपाशिवाय बसले आहेत. यावरुन विरोधक त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून डिवचत आहेत.
मात्र शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळाला तर याचे शिंदे गटात काय पडसाद उमटतात आणि
एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion soon
shivsena shinde camp 4 ministers will excluded from cabinet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा