Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, लिस्ट देखील रेडी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. केवळ दोनच मंत्री संपूर्ण राज्याचा गाडा हाकत आहेत. यावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सरकारच्या अस्तित्वाबाबत ची सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडल्याचा दावाही विरोधक करत आहेत. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra Cabinet Expansion)  शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Shiv Sena MLA Abdul Sattar) यांनी माहिती दिली. 29 जुलैच्या आधी मंत्रिमंडळ जाहीर होईल. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. तसेच मी नेहमी खूश असतो, मंत्रिमंडळ यादीत नाव असो किंवा नसो. कारण मी उधारीवर धंदा करत नाही. मैने नगद बेचा मुझे टेन्शन नही, असं उत्तर सत्तार यांनी मंत्रीपदी तुमची वर्णी लागणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं.

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मातोश्रीचे दारं गेलेल्या आमदारांसाठी अजूनही उघडी असल्याचं वक्तव्य केलं होतं.
त्यावरही सत्तार म्हणाले, मातोश्रीची दारं उघडी असली तरी मी आता परत जाणार नाही, असं सत्तार यांनी सांगितले.
तसेच आदित्य ठाकरेंच्या शक्तीप्रदर्शनाला 31 जुलैला उत्तर देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 तारखेला सिल्लोडमध्ये येणार असल्याचे सत्तार यांनी जाहिर केलं.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet ministers list final oath to take place before 29 july says abdul sattar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘शिंदे-फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का?’ – अजित पवार

 

LIC Policy | या पॉलिसीत मिळेल किमान 22 लाखांचे संरक्षण, सोबतच अनेक लाभ, जाणून घ्या सविस्तर

 

Pune Crime | दुर्दैवी! आजोबांसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीचा डंपरच्या धडकेत मृत्यू