Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर?, अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर तर्क-विर्तक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) बहुचर्चित आणि शेवटच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी (Monsoon Session) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, असं सांगितलं जात होतं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा पावसाळी अधिवेशनानंतरच होऊ शकतो, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. बुधवारी काही आमदारांना मुंबईत बोलवले होते. मात्र, काल आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) मुंबईहून स्वगृही परतले आहेत. त्यामुळे मंत्रिमडळाचा विस्तार लाबल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

 

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडल्याचे समजते. केवळ, खाते वाटपावर आज किंवा उद्या निश्चितपणे अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) आणखी वेट अँड वॉचच्या भूमिकेत जावे लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती, मात्र आता अधिवेशनानंतर विस्तार होणार असल्याचे समजते.

 

नेत्यांमध्ये नाराजीचा सूर

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्यामुळे शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कारण शिंदे गटातील काही नेते मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawle) आणि आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) हे सातत्याने मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होईल, असे सांगत आहेत.

 

एकनाथ शिंदेंची इच्छा अपुरी राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे तातडीने मंत्रिमंडळ विस्तार व्हावा,
यासाठी आग्रही होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होईल.
येत्या एक-दोन दिवसांमध्ये कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा,
यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. आधी मंत्रिमंडळ विस्तार करु, नंतर खातेवाटपाचे पाहून घेऊ,
ही एकनाथ शिंदेंची भूमिका होती. मात्र, मंत्रिमडळ विस्तार पावसाळी अधिवशेनानंतर झाल्यास एकनाथ शिंदेंची ही इच्छा अपुरी राहण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title : Maharashtra Cabinet Expansion | only after the cabinet expansion session after ajit pawars visit to delhi with amit shah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा