Maharashtra Cabinet | शिंदे गटाला ज्याची भीती होती तेच झालं, तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजित पवारांच्या हाती; ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांना डिवचलं, म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet | महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) अर्थमंत्री पदाची (Finance Minister) जबाबदारी असणारे अजित पवार (Ajit Pawar) आम्हाला निधी देत नाहीत, असं कारण सांगून शिवसेना आमदारांनी (Shiv Sena MLA) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाला साथ दिली. पण शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) एन्ट्री केलेल्या अजित पवारांकडे पुन्हा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या. (Maharashtra Cabinet) विशेष म्हणजे शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांचा तीव्र विरोध असूनही अजित पवार यांना अर्थखाते देण्यात आले आहे. यामुळे अजितदादा निधी देत नाहीत, अशी नेहमी ओरडण करणारे शिंदे गटाचे आमदार काय पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवारांना अर्थखाते मिळाल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray Group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.

 

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खातेवाटपावर प्रतिक्रिया देताना म्हटले, अजित पवार यांना अर्थखाते म्हणजे काळाने उगवलेला सूड आहे. अजित पवार निधी देत नाहीत त्यामुळे कामे होत नाहीत, असे हे सांगत होते. मात्र आता तेच अजित पवार अर्थमंत्री बनले हा शिंदे गटाच्या नेत्यांवर काळाने उगवलेला सूड आहे. आमच्यातून गेलेले गद्दार अजित पवारांनी निधी दिला नाही म्हणून गेलो असं सांगत होते ते आता काय करणार असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे. (Maharashtra Cabinet)

 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांना अभय का असा प्रश्न आम्हाला पडला आहे. एखाद्या मंत्र्याबाबत भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होतात त्याच्या भ्रष्टाचाराच्या मालिका लागतात मात्र तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही आणि त्यांचं मंत्रिपद कायम राहत हे दुर्दैव असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

 

आता पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार नाही
आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत. खातेवाटप करताना त्यांच्या नाकी नऊ आले
आणि हाच गोंधळ निस्तरता निस्तरता काळ संपेल असे दानवे म्हणाले.
जे गुडघ्यांना पदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत त्यांना आता काही मिळणार नाही,
असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते
आगे आगे देखो होता है क्या हीच वेळ आता सगळ्यांवर येणार आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.

 

Web Title : Maharashtra Cabinet | opposition-leader-reaction-on-maharashtra-cabinet-criticise-cm-eknath-shinde-camp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा