PM मोदींची ‘साथ’ सोडणाऱ्यांचं ‘वाटोळं’ झालं : CM देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपला जोर लावला असून विविध यात्रांच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना जनतेला आवाहन करण्याचे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या दोन यात्रानंतर आता भाजपने महाजनादेश यात्रा काढली असून महाराष्ट्रातील जवळपास १५० विधानसभा मतदारसंघातून हि यात्रा निघणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या यात्रेचे नेतृत्व करत असून काल नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची हि यात्रा पोहोचली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
यावेळी ते म्हणाले कि, ज्या लोकांनी पंतप्रधान मोदींची साथ सोडली त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. त्याचबरोबर विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले कि, त्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित करण्याऐवजी आपल्या पराभवाचे विश्लेषण करावे तसेच स्वतःमधील कमी दूर करावी. त्याचबरोबर इव्हीएमवार शंका उपस्थित करून विरोधक मतदारांवर देखील अविश्वास दाखवत आहेत. त्यांनी आगोदर आपण जनतेपासून दूर काय गेलो याची समीक्षा करायला हवी.

या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये पोहोचलेल्या फडणवीस यांनी विरोधकांवर कडक प्रहार करत त्यांनी म्हटले कि, सत्य स्वीकारून पुढे जायला हवे. त्याचबरोबर इव्हीएमचा वापर हा काँग्रेसच्या काळापासून होत असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे जेणेकरून थोड्याप्रमाणात का होईना मतदार त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवली.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले कि आमची चर्चा सुरु असून लवकरच यावर निर्णय होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –