Maharashtra College Reopen | राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतरच सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन (Corona first lockdown) पासून राज्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील शाळा महाविद्यालये सुरु (Maharashtra College Reopen) करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. दिवाळीनंतर परिस्थिती पाहून राज्य सरकार महाविद्यालय सुरु (Maharashtra College Reopen) करण्याबद्दल निर्णय घेईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील महाविद्यालय सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समजतेय. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळा उघडण्याचा (Maharashtra school Reopen) निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दिवाळीनंतर महाविद्यालयं (Maharashtra College Reopen) देखील सुरु करण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे.

दरम्यान, राज्यातील शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी परवानगी दिली आहे.
त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात 4 तारखेपासून शाळा प्रत्यक्ष सुरु केल्या जाणार आहेत.
राज्यातील कोविड संक्रमण स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळा प्रत्यक्ष सुरु होणार असल्या तरी त्या सुरुवातीला ऐच्छिक स्वरुपात असतील, असे बच्चू कडू (bacchu kadu) यांनी म्हटले आहे.

Web Title :- Maharashtra College Reopen | maharashtra college reopening uday samant maharashtra government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aquila Restaurant | साडीला Smart Dress न मानणारे रेस्टॉरंट ‘Aquila’ला लागलं कुलूप, ‘या’ कारणामुळे झाली कारवाई

Khadakwasla Irrigation Department | खडकवासाला पाटबंधारे विभागाचा कारभार तुटपुंज्या मनुष्यबळावर; 50 टक्के पदे रिक्त

Udayanraje Bhosale | आता नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना एकाचवेळी परभूत करण्याची राष्ट्रवादीची ‘रणनिती’