‘यवतमाळ’ जिल्ह्यात एका महिलेमुळं तब्बल 23 जणांना ‘कोरोना’ची लागण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका महिलेमुळे 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वास्तविक येथे स्वयंपाक करणारी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. तिने ज्या हातपंपाचा वापर केला होता, त्याच हातपंपावर बरेच लोक येत असत. आता येथे पाणी घेण्यासाठी येणाऱ्यांना हे माहित नव्हते की ती महिला कोरोनाबाधित आहे. अशा परिस्थितीत या लोकांनीही त्याच हातपंपाचा वापर केला आणि आता यामुळे तब्बल 23 लोक कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये पान दुकान चालवणाऱ्या व्यक्तीकडून 7 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले. लॉकडाऊनमुळे पान विकणाऱ्याचे दुकान बंद होते पण लोक त्याच्याकडे गुटख्याची मागणी करत असत. गुटखा खाण्याच्या या छंदामुळे लोकांना कोरोनाची लागण झाली.

महाराष्ट्रात 83% रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे नाहीत, 20% लोक बरे झाले

महाराष्ट्रातील कोविड -19 रुग्णांमधे आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत आणि त्यातील 20 टक्के लोक बरे झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. टोपे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात साथीच्या रोगामुळे मृत्यूचे प्रमाण 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, तर संसर्गाचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यांनी जालना येथे पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्रातील 36 पैकी 14 जिल्हे रेड झोन, 16 ऑरेंज झोन आणि 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

टोपे म्हणाले की, मुंबईमध्ये 2,000 खाटांची व्यवस्था असणारे रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे दाट लोकवस्ती असलेल्या वृद्ध नागरिकांना स्क्रीनिंगनंतर आयसोलेशनमध्ये ठेवता येईल. राज्यभरात सध्या 733 प्रतिबंधित क्षेत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण 10,000 च्या पुढे गेले आहे.