Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाचा ‘हाहाकार’ ! यवतमाळमध्ये ‘एन्ट्री’, राज्यातील रूग्णांची संख्या 22 पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि अहमदनगरनंतर आता यवतमाळ जिल्ह्याता कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आला आहे. यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे निदान झालं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 22 वर पोहचली आहे.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हे दोघेही दुबईला गेले होते. राज्यात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. आतापर्यंत पुण्यात कोरोना व्हायरसचे एकूण 10 रुग्ण आहेत. तर नागपूर आणि मुंबईत प्रत्येकी चार ठाणे आणि अहमदनगर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे.

बुलडाण्यात कोरोना संशयीत रुग्णाचा मृत्यू
सौदी अरेबिया येथून परतल्यानंतर कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आलेल्या 72 वर्षीय वृद्ध इसमाचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज (शनिवार) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना संशियताचा मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. या रुग्णाचे तपासणी अहवाल अद्याप आले नसल्याने सध्यातरी तो कोरोना संशयितच असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले आहे.