Maharashtra Crime News | बालसुधारगृहातून पळालेल्या मुलांचा नागपूर, गोंदियात राडा; पोलिस शिपायाला केले जखमी, गोंदियात पोलीस व्हॅनची तोडफोड, रिक्षाचालकाला लुटले

नागपूर : Maharashtra Crime News | बालसुधार गृहातून (Child Reform Home) पळून गेलेल्या ६ अल्पवयीन मुलांनी गेल्या तीन दिवसांपासून नागपूर (Nagpur News) आणि गोंदियामध्ये राडा घातला आहे. त्यांनी नागपूर आणि गोंदियामध्ये पोलिसांवर हल्ले केले आहेत. बुधवारी रात्री नागपूरमधील सिताबर्डी पोलीस ठाण्यातील (Sitabardi Police Station) पोलिसांवर हल्ला करुन त्याला जखमी केले आहे. (Maharashtra Crime News)

नागपूरमधील पाटणकर चौकात असलेल्या बालसुधारगृहातून रविवारी सहा अल्पवयीन मुले सुरक्षा रक्षकाला मारहाण (Beating) करुन पळून गेले होते. बालसुधारगृहातून पळालेले हे ६ जण विद्यापीठ लायब्ररी चौकात एका रिक्षामध्ये बसले. अंबाझरी मेट्रो स्टेशनला (Ambazari Metro Station) जायचे असल्याचे सांगितले. परंतु वाटेत बजाजनगरजवळ रिक्षा थांबवून त्यांनी चालकाला मारहाण केली. त्याच्याकडील रक्कम लुटून ते पळून गेले. त्यानंतर ते गोंदियाला गेले. तेथे २६ डिसेंबरला रिक्षाने फिरत असताना त्यांची रिक्षा उलटली. घटनास्थळी पोलीस आले. ते कारवाई करु लागल्याचे पाहून त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. पोलीस व्हॅनची तोडफोड करुन तेथून ते पळाले. त्यानंतर ते रेल्वेने नागपूरला आले. नागपूरात ते तीन तीनच्या गटाने फिरत असल्याचे सीसीटीव्हीच्या तपासणीत दिसून आले. बुधवारी रात्री ८ वाजता ते सिताबर्डी परिसरात आले. त्यांनी इटर्निटी मॉलच्या मागील बाजूला एका तृतीयपंथीयाला जखमी करुन लुटले. (Maharashtra Crime News)

त्याची दुचाकी घेऊन ते पळून गेले. याच परिसरात सिताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद तिवारी हे सहकार्‍यासह
गस्त घालत होते. तृतीयपंथीयाने त्यांना घटनेची माहिती दिली. तिवारी व त्यांचे सहकारी त्वरीत ही मुले गेली त्या दिशेने गेले.
तेव्हा मुंजे चौकात ही मुले त्यांना आढळून आली.
दोघांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी चाकू काढून पोलिसांवर हल्ला केला. त्यात तिवारी जखमी झाले आहेत.
सिताबर्डी पोलिसांनी त्यांच्यातील एका मुलाला ताब्यात घेतले असून पाच जण फरार आहेत.
अल्पवयीन मुलांच्या या कृत्याने नागपूरात खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | लाच स्वीकारताना ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

डंपरच्या अपघातात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिकांनी डंपर पेटविला, मंतरवाडी परिसरातील घटना (Video)

Pune Traffic Updates | कोरेगाव भिमा – पेरणे फाटा: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल