Pune Traffic Updates | कोरेगाव भिमा – पेरणे फाटा: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) जवळील पेरणे फाटा येथे नागरिक विजयस्तंभास अभिवादन (Vijay Stambh) करण्यासाठी एकत्र येतात, त्यामुळे सोमवारी (दि. 1 जानेवारी) पुणे-अहमदनगर मार्गावरील (Pune-Nagar Highway) पेरणे फाटा येथे वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस (Pune Traffic Police) उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी दिले आहेत. (Pune Traffic Updates)

पुणे व पिंपरी चिंचवड शहराकडून नगररोड वरुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायांची वाहने वगळून) दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी दुपारी दोन पासून ते दिनांक 1 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

असा असेल वाहतूक बदल (Pune Traffic Updates)

  • पुणे बाजूकडून अहमदनगर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी, खराडी बायपास येथून उजवीकडे वळण घेऊन मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळण घेवून पुणे सोलापूर रोडने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगर रोड कडे जावे (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायांची वाहने वगळून)
  • सोलापूर रोडवरुन आळंदी, चाकण या भागात जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर, मगरपट्टा चौक, उजवीकडे वळण घेऊन खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी येथे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायांची वाहने वगळून)
  • मुंबई येथून नगरकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ, चाकण,खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे नगरला जातील.(विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायांची वाहने वगळून)
  • मुंबई येथून नगरकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे नगरला जातील. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायांची वाहने वगळून)
  • कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर येथून पुणे सोलापूर रोडवरून केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर मार्गे नगर रोडकडे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायांची वाहने वगळून)
  • इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर हा पुल दि. 1 जानेवारी रोजी जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकणाहून केवळ विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण-शिक्रापूर रोडचा वापर करावा.
  • विश्रांतवाडी – लोहगाव मार्गे वाघोली व वाघोली-लोहगाव मार्गे विश्रांतवाडीकडे जाणारी जड वाहतूक 31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 दरम्यान बंद करण्यात येत आहे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायांची वाहने वगळून)

वाहन पार्किंग ठिकाणे

  1. पुणे आळंदी, थेऊर, केसनंद, अष्टापुर डोंगरगावाच्या दिशेने पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या वाहनांसाठी खालील ठिकाणी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग ठिकाणापासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे.
  • लोणीकंद ‘आपले घर’च्या शेजारील पार्किंग क्रमांक 1 – दुचाकी पार्किंग
  • लोणीकंद ‘आपले घर’शेजारील पार्किंग क्रमांक 2 – चारचाकी पार्किंग
  • लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी पार्किंग क्रमांक 3- चारचाकी पार्किंग
  • लोणीकंद ‘आपले घर’ सोसायटीच्या मागे पाक्रिंग क्रमांक 4- खासगी बस व मोठी वाहने
  • लोणीकंद मोनिका हॉटेल शेजारील पार्किंग क्रमांक 5 – दुचाकी पार्किंग
  • हॉटेल ओम साई लॉजच्या पाठीमागील पार्किंग क्रमांक 6- चारचाकी पार्किंग
  • तुळापुर फाटा स्टफ कंपनी शेजारील पार्किंग क्रमांक 7 – चारचाकी पार्किंग
  • तुळापुर फाटा राजशाही मिसळ हॉटेल मागे पार्किंग क्रमांक 8 – दुचाकी पार्किंग

1 जानेवारी 2024 रोजी पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सोमेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग एकेरी राहील (PMPML बस वगळून)

  1. आळंदी कडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग
  • तुळापुर रोड वाय पॉईंट समोरील पार्किंग क्र.9 – चारचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड हॉटेल शेतकरी मिसळ शेजारील पार्किंग क्र. 10- दुचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड हॉटेल रॉयल लॉजच्या शेजारील पार्किंग क्र. 11 – दुचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड हॉटेल चिंचवन समोर पार्किंग क्र. 12 – चारचाकी पार्किंग
  • तुळापुर रोड फुलगाव सैनिक शाळा मैदान पार्किंग क्र.13 – चारचाकी पार्किंग
    पार्किंग ठिकाणापासून विजयस्तंभ पर्यंत जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे.

  1. थेऊर/सोलापूर कडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग
  • सोमवंशी अॅकॅडमी समोर थेऊर रोड पार्किंग क्र. 14 – चारचाकी पार्किंग
  • थेऊर रोड, खंडोबाचा माळ वेअर हाऊस शेजारी पार्किंग क्र. 15 – चारचाकी पार्किंग
  • थेऊर रोड खंडोबा माळ पार्किंग क्र. 16 – दुचाकी पार्किंग
  1. अष्टपुर डोंगरगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग
  • पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील मोकळे मैदान पार्किंग क्र.17 – दुचाकी/चारचाकी पार्किंग

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | लाच स्वीकारताना ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Accident News | डंपरच्या अपघातात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिकांनी डंपर पेटविला, मंतरवाडी परिसरातील घटना (Video)