काय सांगता ! होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’, ‘TikTok’ व्हिडिओवर चर्चा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज पुण्यात झाली. शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानामध्ये झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत गाजलेला डॉयलॉग म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा. मी पुन्हा येईल या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याने सोशल मीडियात धुमाकुळ घातला. अनेकांनी यावर जोक्स, मीम्सचा वापर अनेक कार्यक्रमात केला. मी पुन्हा येईल या वाक्यानंतर फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावर देखील अनेक जोक्स आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वाक्याची चर्चा ज्या प्रकारे सोशल मीडियामध्ये आहे तशी राजकीय बैठकीत देखील आहे. सत्ता स्थापनेसाठी पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये याच वाक्यावर पुन्हा चर्चा झाल्याचे पहायला मिळाली. अर्थात ही चर्चा विनोदाच्या स्वरूपात होती. यामध्ये भुजबळ म्हणतात, पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रना घेऊन गेला हे ही बरं झालं. त्यावर जितेंद्र आव्हाड सांगतात, टीकटॉक किती येतायेत त्यावर, एक म्हातारा माणूस म्हणतो, मी पुन्हा येईन, त्यावर एक जण म्हणतो येताना जरा नवटाक घेऊन ये.

तर जयंत पाटील यांनी नवटाक नव्हे तर चुना चुना घेऊन ये अशी दुरुस्ती करतात. तर बैठकीत एक जण आलाय की येणार आहे असे पाटील म्हणतात. त्यावर धनंजय मुंडे लगेच तो डायलॉग चला हवा येऊद्या मधील भाऊ कदमचा असल्याचे सांगतात. तसेच तो गेला बरं झाला, पाऊस पण थांबला असं सांगत बैठखीत हस्याचे फवारे उडतात.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like