Maharashtra Farmers Day | राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Farmers Day | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil) यांच्या स्मरणार्थ 30 ऑगस्ट हा दिवस ‘शेतकरी दिन’ (Maharashtra Farmers Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने (State Government) एक शासन निर्णय (GR) जारी केला आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून 30 ऑगस्ट 2023 या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील (Co-operative Sector) एक मोठे नाव होते. सहकारातील तज्ज्ञ म्हणून त्यांच्यातडे पाहिले जात. डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक होते. इंग्रज सरकारने आणलेल्या तुकडे बंदी आणि तुकडे जोड विधायकामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती. विखे पाटलांनी सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल 1961 साली केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला. (Maharashtra Farmers Day)

शैक्षणिक क्षेत्रातही योगदान

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व
महाविद्यालये यांची स्थापना त्यांनी पुढाकार घेऊन केली. तसेच त्यांनी या शाळांना आर्थिक सहकार्य केले.
शैक्षणिक कार्यात त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना (Karmaveer Bhaurao Patil) यथाशक्ति साथ दिली.
समाजातील खालच्या स्तरापर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठीही त्यांनी काम केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही, देवेंद्र फडणवीसांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण (व्हिडीओ)