Devendra Fadnavis | आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही, देवेंद्र फडणवीसांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण (व्हिडीओ)

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थान होण्यापूर्वी वारकऱ्यांवर (Varkari) लाठीचार्ज (Lathicharge) झाला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत (Legislative Council) स्पष्टीकरण दिलं आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, ही वस्तुस्थिती नाही. वारकऱ्यांवर कोणतेही सरकार लाठीचार्ज करत नसते, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

ADV

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, ही वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्रात कोणतेही सरकार वारकऱ्यांवर लाठीचार्ज करत नसते. गेल्यावर्षी आळंदीतील मंदिरात (Alandi Temple) प्रवेश दिल्यावर महिलांच्या अंगावर महिला पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे यंदा वरिष्ठ पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, 56 दिंड्या प्रमुख आणि मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक झाली. त्यात 56 दिंड्यांना प्रत्येकी 75 पास द्यायचे. त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा आणि नंतर बाकीचे प्रवेश सुरु करायचे, असं ठरलं होतं. या निर्णयानंतर 56 दिंड्यांचे प्रत्येकी 75 लोक मंदिरात होते.

त्यावेळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे (Jog Maharaj Warkari Educational Institution) आजी-माजी विद्यार्थी मंदिराबाहेर जमा झाले. विद्यार्थ्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. मात्र, 56 दिड्यांनंतर तुम्हाला प्रवेश दिला जाईल, असं सांगण्यात आलं. पोलीस, नागरिक, संस्थेचे चोपदार आणि पालखी प्रमुखांनी विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी विनंती करण्यात आली. मात्र, ते ऐकण्यास तयार नव्हते. विद्यार्थी बॅरिगेट्स तोडून पोलिसांच्या (Pune Police) अंगावर धावले. तरीही त्यांना थांबवण्यात आलं. पुन्हा बॅरिगेट्सपर्यंत माघारी आणलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात आले.
पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ दाखवले आहेत. मात्र, त्यात कुठेही लाठीचार्ज झाला नाही.
एका वारकऱ्याने स्वत: पोलीस ठाण्यात सांगितलं की, पोलिसांनी वारकऱ्यांना कोणतीही मारहाण केलेली नाही,
असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Padma Awards | पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करण्यासाठी समिती स्थापन;
अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार, ‘या’ नेत्यांचाही समितीमध्ये समावेश