Maharashtra Industries Minister Uday Samant | हिंगणघाटातील ‘वना’ नदीवर बंधारा बांधकामास मंजुरी देणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई : Maharashtra Industries Minister Uday Samant | हिंगणघाट शहराला (Hinganghat) पाणीपुरवठा करण्यासाठी वना नदीवरील बंधारा बांधकामास मंजुरी देण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant ) यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.

विधानसभा सदस्य समीर कुणावार (MLA Samir Kunawar) यांनी हिंगणघाट येथे नवीन बंधारा बांधकामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले,
केंद्र पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत हिंगणघाट शहराच्या 61.80 कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पात 15 द. ल. लि. क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व वितरण व्यवस्था आणि इतर कामांचा समावेश असून सद्यस्थितीत पाणीपुरवठा प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. हिंगणघाट येथे बंधारा बांधण्याबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेकडून शासनास सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या पुढील बैठकीत हा प्रस्ताव सादर येईल आणि त्यानंतर मंजुरी देण्यात येईल.

Web Title : Maharashtra Industries Minister Uday Samant | Industry Minister Uday Samant will approve the construction of a dam on the ‘Wana’ river in Hinganghat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार