Maharashtra IPS Officer Transfer | पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officer Transfer | पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अक्षीक्षकपदी अंकित गोयल (IPS Ankit Goyal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने (State Government) गुरूवारी रात्री पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. यापुर्वी ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख (Dr. Abhinav Deshmukh) यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहे . (Maharashtra IPS Officer Transfer)

 

अंकित गोयल हे यापुर्वी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक (Gadchiroli SP) होते. त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गोयल चर्चेत आले होते. त्यांची नियुक्ती आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी (Pune Rural Superintendent of Police) करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणूका, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासमोरे आव्हान असणार आहे.

 

Web Title :- Ankit Goyal as Pune Rural Police Superintendent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा