Maharashtra Lokayukta Act | राज्यात येणार लोकायुक्त कायदा; विखे पाटलांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Lokayukta Act | लोकायुक्त कायदा संमत करण्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली आहे. येत्या अधिवेशनामध्ये लोकायुक्त कायदा (Maharashtra Lokayukta Act) संमत करण्यासंदर्भात अण्णा हजारे यांच्याशी विखे पाटील यांनी चर्चा केली असल्याची माहिती आहे.

लोकायुक्त सक्षम (Maharashtra Lokayukta Act) करण्यासाठी जी समिती आहे, त्या समितीच्या अध्यक्षपदी विखे पाटील आहेत. विधानसभेत हा कायदा मंजूर झाला आहे, तर विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी आहे. सुधारित कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील घेण्याबाबत चर्चा झाल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. येणाऱ्या अधिवेशनामध्ये (हिवाळी अधिवेशन) विधेयक मंजूर न झाल्यास अध्यादेश काढण्याबाबत देखील सरकार विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकायुक्त कायद्याबाबत सरकार वेळकाढूपणा करत नसून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री (CM)
असताना हा कायदा विधानसभेमध्ये (Legislative Assembly) मंजूर झाला. मात्र विधान परिषदेमध्ये (Legislative Council) संख्याबळ कमी असल्याने विरोधकांच्या विरोधामुळे हा कायदा तिथे संमत झाला नाही, असे विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, भेटीनंतर अण्णा हजारे यांना हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Sessions) विधेयक मंजूर करण्याबाबतचा
शब्द विखे पाटील यांनी दिला असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. या विधेयकाबाबत अनेक आश्वासने दिली गेली.
आता ठोस भूमिका घेऊन काहीतरी करा, असे आपण विखे पाटील यांना सांगितल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले.
सरकारवर विश्वास ठेवायला हवा, असेही अण्णा हजारे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | ‘ठाकरेंनीच महाराष्ट्रात युती तोडली, भाजपने नाही’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Maharashtra Rain | महाराष्ट्रात 10 ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही