Maharashtra MLC Election | आमदार लक्ष्मण जगतापांच्या भावाचे शिवसेनेला प्रत्युत्तर; म्हणाले – ‘पक्षाने आम्हाला ‘तो’ पर्याय दिला होता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election | विधान परिषदेच्या दहा जागेसाठी आज मतदान (Maharashtra MLC Election) पार पडत आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली ताकद पणाला लावली आहे. दहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार रस्सीखेच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचं अगदी बारकाईने लक्ष असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीतही मतदान करण्यासाठी पुण्यातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांना बोलावण्यात आले आहे. यावरुन भाजपने मतांसाठी माणुसकी तुडवून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या दोन्ही आमदारांना स्ट्रेचर आणि व्हिलचेअरवरून आणले, असं ‘सामना’ त म्हटले होते. यानंतर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

शंकर जगताप म्हणाले, “सामना’ मधून काय आरोप करण्यात आले ते मला माहिती नाही. पण पक्षाने आम्हाला स्पष्ट सांगितले होते की, तब्येत ठीक नसेल तर येऊ नका,” अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या पाचव्या जागेसाठी पुण्यातील या दोन्ही आमदारांचे मते महत्वाचे आहेत. त्यामुळे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. (Maharashtra MLC Election)

दरम्यान, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटर त्यांचा श्वास आहे, असे म्हणतात.
पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवरून मतांसाठी आणले जात आहे.
विजयाची आणि चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी ? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो, असे ‘सामना’ तील अग्रलेखात म्हटलेय.
त्यानंतर लक्ष्मण जगताप यांच्या भावाने याला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

Web Title :-  Maharashtra MLC Election | bjp mla laxman jagtap brother hits back shivsena over mlc elections 2022 vidhanparishad election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा