Maharashtra MLC Election Result | नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी; भाजपचे नागो गाणार पराभूत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या जागांसाठीची मतमोजणी (Maharashtra MLC Election Result) सध्या सुरू आहे. पहिला निकाल हाती आला तेव्हा कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी शेकापचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा पराभव केला. तर नुकतचं हाती आलेल्या निकालानुसार, नागपूर शिक्षक मतदारसंघात (Nagpur Teachers Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) यांनी भाजपच्या नागोराव गाणार (Nagorao Ganar) यांना पराभूत करत विजय संपादित केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरात भाजपला भेदण्यात महाविकास आघाडीला यश आल्यामुळे हा विजय खूप महत्वाचा मानला जातो. (Maharashtra MLC Election Result)
नागपूर येथील अजनी समुदाय भवन येथे सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. यानंतर मतमोजणी करण्यात आलेल्या पहिल्या फेरीनंतर पहिली पसंती असलेली सर्वाधिक मते मिळवत महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले यांनी विजय संपादित केला. सुधाकर आडबाले यांनी जवळपास ७७०३ मतांनी भाजप उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला. पहिल्या फेरी अखेर सुधाकर आडबाले यांना पहिल्या पसंतीची १४०६९ मते मिळाली. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. भाजपचा गड असलेल्या नागपूरात महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. (Maharashtra MLC Election Result)
नागपूर शिक्षक मतदारसंघातील पहिल्या फेरीतील २८ हजार मतांपैकी सुधाकर आडबाले यांना १४०६९, तर भाजपचे नागो गाणार यांना ६३६६, राजेंद्र झाडे (Rajendra Zade) यांना २७४२, सतिष इटकेलवार (Satish Itkelwar) ६० अशी मते मिळाली. तर, १०९९ मते अवैध होती.
दरम्यान, पहिल्या फेरीतचं आपल्या मतांचा कोटा पूर्ण करत सुधाकर आडबाले यांनी बाजी मारली.
गेल्या दहा वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात होती.
मात्र अखेर भाजपला नागपूर शिक्षक मतदारसंघात भेदण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे.
पहिल्या फेरीतील आघाडीनंतर लगेचचं आडबाले समर्थकांनी जल्लोश सुरू केला.
भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका.
नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 2, 2023
आडबाले यांच्या विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत आडबाले यांना शुभेच्छा दिल्या.
Web Title :- Maharashtra MLC Election Result | nagpur division teacher constituency bjp mavia adbale leads by 7 thousand
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update