Maharashtra MLC Election | ‘मामाने पक्षाला मामा बनवलं’ बाळासाहेब थोरातांना टोला लगावताना विखे पाटलांचे सत्यजित तांबेंच्या भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पहिल्या दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदविधर निवडणुकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक पदविधर निवडणुकीत (Maharashtra MLC Election) झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजप (BJP) सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पाठिंबा देणार का याबाबत शेवटपर्यंत उत्सुकता (Maharashtra MLC Election) लागून राहिली होती. मात्र भाजपने आपली भूमिका जाहीर केली नाही. भाजपने तांबे यांना पाठिंबा दिला नसला तरी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) हे तांबेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे पहायला मिळत आहे. एवढंच नाही तर सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

 

सत्यजित तांबेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबे हे निश्चित विजयी होणार, अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची गरज नाही, नाशिक पदवीधर मतदारसंघात (Maharashtra MLC Election) भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्यासाठी मोठं काम केलं आहे. भाजपने त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा सत्यजित तांबे सन्मान ठेवतील हा विश्वास आहे. सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

मामाने पक्षाला मामा बनवलं
यावेळी विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना टोला लगावला.
मामाने पक्षाला मामा बनवल्याचे विखे पाटील म्हणाले. तसेच सुधीर तांबे (Sudhir Tambe)
यांनी आमच्यात काँग्रेसचे (Congress) रक्त असून आपण कँग्रेसमध्ये असल्याचे वक्तव्य केले होते.
यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, सुधीर तांबे हे काँग्रेसकडून तीनवेळा निवडून आले आहेत.
त्यामुळे त्यांच्या रक्तात अद्यापही थोडी काँग्रेस शिल्लक असेल. काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल,
असं विखे पाटील म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra MLC Election | will satyajit tambe join bjp radhakrishna vikhe patils indicative statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी?, शिवसेना निवडणूक लढवणार, काँग्रेस काय घेणार निर्णय?

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR