Maharashtra Monsoon Season | अजित पवारांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री ‘क्लीन बोल्ड’, सरकारची नामुष्की

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Season | राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्यानंतर आज दुसऱ्या (Maharashtra Monsoon Season) दिवशीही सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) आणि राज्य सरकारमधील मंत्री आमने- सामने आल्याचे पहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Public Health and Family Welfare Minister Tanaji Sawant) यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना तानाजी सावंत यांनी वापरलेल्या ‘फेमस’ या शब्दामुळे सभागृहात मोठा गदारोळ उडाला.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसदर्भात केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. शिंदे सरकारच्या (Shinde Government) कारकिर्दीत अधिवेशनात (Maharashtra Monsoon Season) पहिलाच प्रश्न उत्तर साठी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे.

 

अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात (Palghar District) हत्तीरोग (Elephantiasis) रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी,
कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी,
मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे तानाजी सावंत यांना विचारली होती.
ही माहिती त्यांच्याकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवला.

 

‘फेमस’ शब्दावरुन शिवसेना आणि शिंदे गटात खडाजंगी

बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपातामुळे (Illegal Abortion) झालेला मृत्यू या प्रश्नावर उत्तर देताना सभागृहात शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटातल्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस आहे, असं उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं,
पण फेमस म्हणजे लोकप्रिय या शब्दावर ठाकरे गटातील (Thackeray Group) आमदार सुनिल प्रभू (MLA Sunil Prabhu)
यांनी तीव्र आक्षेप घेतला.
यानंतर सावंत यांच्या मदतीला शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) उठले.
मात्र अजित पवार यांनी हस्तक्षेप करत फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा नसून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली.
या सुचनेचा विचार केला जाईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं.

 

Web Title : –  Maharashtra Monsoon Season | opposition leader ajit pawars question but health minister tanaji sawant not given answer to him maharashtra vidhan sabha live news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा