Shivsena | ‘तुम्ही पाठित खंजीर खुपसला, आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नका’; शिवसेना महिला नेत्याचा आदित्य ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) बंड झाल्यानंतर शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) हे बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) टीका करताना गद्दार हा शब्द वापरत आहेत. गद्दार, विश्वासघातकी आणि पाठित खंजीर खुपसला असे म्हणत आदित्य ठाकरे शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांवर जबरी टीका करत आहेत. त्यांचा हाच पवित्रा विधिमंडळाच्या अधिवेशन (Legislative Session) काळात देखील पहायला मिळाला. त्यांनी बंडखोरांवर पुन्हा निशाणा साधताना विश्वासघातकी असे म्हणत हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळेल असे म्हटले होते. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पलटवार केला आहे. माजी नगरसेवक शीतल म्हात्रेंनी (Former Corporator Sheetal Mhatre) आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.

 

शीतल म्हात्रे यांनी शिवसेना नेते (Shivsena) आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करताना म्हणाल्या, आदित्यजी, गेल्या अनेक दिवसांपासून पाठित खंजीर खुपसणं, गद्दारी, विश्वासघात हे शब्द आम्ही आपल्या तोंडून ऐकत आहोत. खरं तर या विषयावर बोलायचं नव्हतं, बोलणार ही नव्हते. पण आज आपण बोलायला भाग पाडत आहात. या शब्दांची व्याख्या आपण समजून घेतली तर बरं होईल. आज आपण आमदार झालात, त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray) यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो लावून मतं मागितली. त्यामुळे, आपल्या आमदार होण्यामागे कुठेतरी भाजपचीही (BJP) मतं आहेत, हे विसरु नका.

तुम्ही पाठीत खंजीर खुपसला

आपण महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करुन सत्तेत आला.
त्यामुळे कोणी विश्वासघात केला असेल तर तो आपण केलाय. कोणी मतदारांच्या पाठित खंजीर खुपसला असेल तर तो आपण खुपसलाय.
जर कोणी गद्दारी केली असेल तर ती माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आपण केलीय असे म्हणत शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे.

 

आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नका

बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आम्ही रामराज्य आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
जर राजीनामा (Resignation) कुणाला द्यायचा असेल तर तो आपण द्यावा,
आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून आपण निवडून यावं, मग समजेल खरं हिंदुत्व (Hindutva) काय असतं.
त्यामुळे आम्हाला शिकवू नये, हिंदुत्व काय असतं, अशा शब्दात शीतल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.

 

Web Title : –  Shivsena | post a picture of the leaders of the mahavikas aghadi and won in election a challenge to aditya thackeray by shivsena shital mhatre

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा