Maharashtra Monsoon Session | पुण्यासाठी 21 टीएमसी पाणी द्या, आमदार रविंद्र धंगेकर यांची अधिवेशनात मागणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | मुंबईमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधीवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Assembly Constituency) आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट 34 गावांसह शहराच्या पाणी पुरवठ्या (Water Supply) बाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. (Maharashtra Monsoon Session)

 

 

गेली कित्येक वर्ष पुणे शहरामध्ये आणि पेठांमध्ये पाणी योजनेत लोकांना पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मी ज्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येतोय हा पेठांचा भाग आहे. आणि त्याचबरोबर पुणे शहरामध्ये उपनगर आहेत. या उपनगरामध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पानशेत धरणाच्या (Panshet Dam) साखळीमधील 22 टीएमसी पाण्याची मागणी महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) केली आहे. पुणे महानगर पालिकेच्या मागणीनुसार समाविष्ट गावांसहीत संपूर्ण शहराची तहान भागवण्यासाठी 21 टीएमसी पाणी पुणे शहराला द्यावे. पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची ही मागणी पूर्ण करणार का? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी सभागृहात विचारला. (Maharashtra Monsoon Session)

 

 

 

रविंद्र धंगेकर यांनी पुणे शहरातील मध्य पेठांचा भाग व वाढलेली लोकसंख्या पाहता शासन 21 टीएमसी पाणी देणार का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, पुणे महानगरपालिकेमध्ये जी 34 गावे समाविष्ट झाली आहेत, त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. याच्यासाठी 1500 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय झालेला आहे. याची पाच टेंडर झालेली आहेत. 29 गावांचा डीपीआर (DPR) तयार करण्याचे काम सुरु आहे. हा डीपाआर तयार झाल्यानंतर यालाही पैसे उपलब्ध करुन देणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

 

Web Title : Maharashtra Monsoon Session | Give 21 TMC of water to Pune, MLA Ravindra Dhangekar demands in session (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा