Maharashtra Monsoon Session | ‘विरोधी पक्षनेत्यांनी आम्हाला जे शहाणपण शिकवले ते…’ निधीवाटपावरुन सभागृहात खडाजंगी, देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘मला दुर्दैवाने इतिहासात…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | राज्यात शिंदे गट (Shinde Group), अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि भाजप (BJP) असं तीन चाकी सरकार सत्तेवर आल्यानंतर निधीवाटप करण्यात आले. वित्तमंत्री अजित पवार (Finance Minister) यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांना (Rebel MLA) भरघोस निधी दिला असून विरोधी पक्षातील आमदारांनी निधी दिला नसल्याचा आरोप पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) केला. यावरुन अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वादळी चर्चा झाली. विधानसभेतील आमदारांना निधी वाटपातील (Fund Allocation) असमानतेचे पडसाद विधान परिषदेत उमटले. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सविस्तर उत्तर देताना महाविकास आघाडीच्या सरकारवर (Mahavikas Aghadi Government) हल्लाबोल केला.

निधी वाटपावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुद्दा उपस्थितीत करताना, 50 कोटींच्या निधीसाठी मलाही फोन आले होते, हे मी दाव्यानिशी सांगू शकतो, असे दानवे म्हणाले. यावरुन देवेंद्र फडणवीस म्हणाले, निधी वाटपासंदर्भात प्रस्ताव येत असतात. प्रस्तावांर विभाग इपीसी (ECP) तयार करतं, इपीसी प्रत्येक विभागाकडून आलेले प्रस्ताव, विभागाकडे पैसे किती आहेत, किती समाविष्ट होऊ शकतात, किती खर्च केलाय, या अनुषंगाने मान्यता दिली जाते. त्यानंतर चर्चा होऊन मागण्या अंतिम होतात. या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक वेळा आलेले सर्व प्रस्ताव मंजूर होतातच असे नाही, बरेचसे होत नाहीत. (Maharashtra Monsoon Session)

मला दुर्दैवाने थोडं इतिहासात जावं लागेल

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला दुर्दैवाने थोडं इतिहासात जावं लागेल. पाच वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. या पाच वर्षात एकदाही अशी चर्चा सभागृहात झाली नाही. कारण राज्यात तशी परंपराच नाही. एकदा झाली होती. तेव्हा आम्ही कोर्टात वगैरे गेलो होतो.

अडीच वर्षात एक फुटकी कवडी मिळाली नाही

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या राज्यामध्ये अडीच वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या काळात एक नवा पैसा खर्च करता आला नाही. राज्याच्या प्रमुखाच्या सहीशिवाय एक पैसाही खर्च करता येत नाही. अडीच वर्षात एक फुटकी कवडी देखील मिळाली नाही. बाकीच्यांना मिळाले. मात्र, कोविड (Covid) हे फक्त विरोधी पक्षाकरता होतं, अशी टीका त्यांनी केली.

आम्हाला जे शहाणपण शिकवलं ते…

महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला फुटकी कवडी मिळाली नाही.
एक नवीन पायंडा पडला, हे चुकीचं आहे. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार अशा मताचा मी नाही.
पण इतिहासात जावंच लागेल. विरोधी पक्षनेत्यांनी आम्हाला जे शहाणपण शिकवलं ते तेव्हाच्या सरकारला शिकवलं
असतं तर अशी परिस्थिती आली नसती, अशा शब्दात फडणवीस यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला.


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RSS Madandas Devi Passed Away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यस्कार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार