Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मोसमी पावसाची प्रतीक्षा ! मान्सून कर्नाटक-गोवा सीमाभागातच रेंगाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मोसमी पावसाचे (Maharashtra Monsoon Rains) आगमन होईल असं चित्र होतं. याबाबत अधिकृत अंदाजही भारतीय हवामान खात्याने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला होता. दरम्यान पावसानं गंमत केली का काय? असा सवाल सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस कर्नाटक-गोवा (Karnataka-Goa Border) सीमाभागात अडकून पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यायला आणखी प्रतीक्षा (Maharashtra Monsoon Update) करावी लागणार आहे.

 

मोसमी पावसाला (Monsoon Rain) पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास साधारण 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) दिला होता. सध्या कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra) या भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे उकाडा देखील वाढला आहे. महाराष्ट्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागात उन्हाचा कडाका लागला आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, विदर्भात (Vidarbha) उष्णतेची लाट कायम आहे.
काही भागांत आगामी दोन ते तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरी बरसतील
असा अंदाज देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आता महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन कधी होतंय? याकडे डोळे लागून आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon stopped on karnataka goa border
june 12 is new date for arrival in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा