Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने दिला ‘ग्लोबल मंदी’चा इशारा, जाणून घ्या कोणत्या कारणामुळे बिघडू शकते जगाची स्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू झाल्यानंतर देशात जागतिक मंदीचा काळ सुरू झाला. सुरुवातीच्या दिवसांत परिस्थिती खूपच बिकट झाली (Russia-Ukraine War), सर्व देशांच्या शेअर बाजारात मोठी घसरण (Share Markets Falling) झाली, पण नंतर हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येऊ लागले. (Global Economic Recession)

 

येत्या काही दिवसात सर्वकाही सुरळीत होईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा (Global Recession) परिणाम अजूनही होत आहे. येत्या काळात जागतिक मंदीचे सावट पाहायला मिळण्याची भीती जागतिक बँकेने (World Bank) व्यक्त केली आहे.

 

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) यांनी म्हटले आहे की, युद्धाचा मोठा परिणाम अन्न, ऊर्जा आणि खतांच्या पुरवठ्यावर होत आहे. जागतिक बँकेने आधीच 2022 साठी आपला ग्लोबल ग्रोथ अंदाज 1 टक्क्यांनी कमी करून 3.2 टक्क्यांवर आणला आहे. (Russia-Ukraine War)

 

यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात मालपास म्हणाले की, उर्जेच्या वाढलेल्या किमतींमुळे जर्मनीची अर्थव्यवस्था मंदावली आहे, जी जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. खतांच्या तुटवड्यामुळे अनेक देशांतील परिस्थिती बिघडू शकते, असे ते म्हणाले.

 

मालपास म्हणतात की, जागतिक जीडीपी पाहता, मंदी कशी टाळता येईल हे आत्ताच सांगता येणार नाही.
या युद्धाचा सर्वाधिक फटका युरोपीय देश चीन आणि अमेरिका यांना बसण्याची शक्यता आहे.
त्याच वेळी, खते, खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि उर्जेच्या किमती वाढल्यामुळे विकसनशील देशांचा विकास मंदावू शकतो.

IMF ला दिसत नाही कोणतीही मंदी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या महासंचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी नुकतेच जग मंदीकडे वाटचाल करत
असल्याच्या भीतीवर सांगितले की, अशी परिस्थिती सध्या तरी नाही पण ती पूर्णपणे परिस्थितीच्या बाहेरही नाही.

 

जॉर्जिव्हा यांनी येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या वार्षिक बैठकीत सांगितले
की, आयएमएफने 2022 कॅलेंडर वर्षात जागतिक विकासदर 3.6 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जी जागतिक मंदीपासून दूरची परिस्थिती आहे.

 

जागतिक अर्थव्यवस्थेवरील चर्चेत भाग घेताना, आयएमएफ प्रमुख म्हणाल्या की हे एक ‘कठीण वर्ष‘ असणार आहे
आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याच्या किमती वाढणे ही एक मोठी समस्या आहे.

 

Web Title :- Russia-Ukraine War | russia ukraine war world bank president warns over global recession know what may be the reasons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

PMC Encroachment Department | काही अटीशर्तींवर सारसबाग, तुळशीबाग आणि बिबवेवाडी येथील स्टॉलधारकांना व्यवसाय करण्याची परवानगी !

 

Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक