Maharashtra Municipal Election-2022 | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जून-जुलै की ऑक्टोबर महिन्यात ? आज होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Municipal Election-2022 | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body Elections) घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला (Maharashtra State Election Commission) दिले होते. परंतु, पावसामुळे जून जुलैमध्ये निवडणूक घेणे शक्य नसल्याचे आयोगाचे म्हणणे होते. त्यामुळे निवडणुका (Maharashtra Municipal Election-2022) जून – जुलै की ऑक्टोबरमध्ये होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात आयोगाने जो अर्ज दाखल केला आहे त्यावर आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

न्यायालयाने 4 मे ला निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आयोगाला दिले होते.
मुंबईसह 14 महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 18 मे ला जाहीर होईल.
न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रक्रिया सुरू केली तरी 31 जुलैनंतरच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आयोगाला शक्य होईल.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसामुळे निवडणुका घेणे शक्य होणार नाही, अशी असमर्थता आयोगाने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात व्यक्त केली आहे. (Maharashtra Municipal Election-2022)

 

विनंती मान्य झाली नाही तर काय ?
निवडणुका घेण्यासाठी जुलै किंवा ऑगस्टशिवाय पर्याय नसेल.
पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका व ऑक्टोबर मध्ये 25 जिल्हा परिषद, त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समिती आणि दोन हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचा पर्याय आहे.
जर न्यायालयाने सर्वच निवडणूका एकाच वेळी घ्या असे आदेश दिले तर ऐन पावसाळ्यात निवडणुकीचा फड रंगणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Municipal Election-2022 | Maharashtra Municipal Election 2022 in june july or october the hearing will be held in the supreme court today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा