Maharashtra Municipal Elections : नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय

मुंबई – Maharashtra Municipal Elections राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
(Maharashtra Municipal Elections)

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार
सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे.
त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title :- Maharashtra Municipal Elections: News that upcoming municipal elections will be held in January is baseless; The State Election Commission will take a decision after the final outcome of the hearing in the Supreme Court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Congress | आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ईडी आणि सीबीआय चौकशी करा, काँग्रेसची मागणी (व्हिडिओ)

Sushma Andhare | नशीब, नोटांवर फडणवीसांचे फोटो छापण्याची मागणी कोणी केली नाही

Maharashtra Politics | मनसे सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा पक्ष, शिवसेनेच्या महिला नेत्याची खोचक शब्दांत टीका

MLA Anil Parab | ’50 खोके जर मिळाले नसतील, तर…’, अनिल परब यांचा बच्चू कडूंना टोला