Sushma Andhare | नशीब, नोटांवर फडणवीसांचे फोटो छापण्याची मागणी कोणी केली नाही

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली होती. त्यावर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी देखील नोटांवर मोदी, सावरकर, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे फोटो छापण्याची मागणी केली आहे. त्यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाष्य केले आहे. नशीब कोणी नोटांवर देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) फोटो छापण्याची मागणी केली नाही, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

 

पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, असा चिमटा काढून सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, राम कदम विद्वान आहेत. नशीब देवेंद्र फडणवीसांचा फोटो छापण्याची मागणी त्यांनी केली नाही. अंधभक्ती किती असावी, याचे हे उदाहरण आहे.

 

आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात वाद सुरु आहेत.
रवी राणा यांनी बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्यावर पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे ते संतापले आहेत. आगामी काळात राणा यांना न्यायालयात खेचण्याची भाषा बच्चू कडू करत आहेत.
त्यावर देखील सुषमा अंधारे यांनी भाष्य केले. बच्चू कडू यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी केले पाहिजे.
कारण, हा बच्चू कडू यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिंदुत्वाचा फुगा फुगवला आहे. त्याला टाचणी लागण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे टाचणी लागण्याच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी खोक्याचे वाटप समसमान करुन टाकावे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

 

Web Title :- Sushma Andhare | no demand devendra fadnavis photo indian currency sushma andhare taunt ram kadam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्‍यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

Keshav Upadhye | ‘वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!’ केशव उपाध्ये यांची टीका