×
Homeताज्या बातम्याMaharashtra Politics | मनसे सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा पक्ष, शिवसेनेच्या महिला नेत्याची...

Maharashtra Politics | मनसे सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा पक्ष, शिवसेनेच्या महिला नेत्याची खोचक शब्दांत टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगाबादमध्ये 4 मे रोजी झालेल्या सभेत मशिदीवरील ‘भोंगे’ हटवावे अन्यथा, हनुमान चालीसाचे वाचन करू, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दिला होता. यानंतर राज्यभर नव्हे तर (Maharashtra Politics) देशात ही चर्चा सुरू झाली होती. परंतु राज्यात भाजपाचे (BJP) सरकार येताच मनसे भोंग्याबाबत गप्प आहे. आता मनसेने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘भोंगे’ लावले आहेत. यावरून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मनसेला ‘रंग बदलणारा सरडा’ म्हटले आहे. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मनसेची भूमिका सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. भोंगे वाजवले, पुन्ह बंद केले, लोकांना किती गृहित धरणार. किती खोटे बोलायचे. त्यांच्या पक्षाचे नाव वेगळे आणि प्रत्यक्षात कृती वेगळी आहे. लोकांच्या मनात आपल्या पक्षाविषयी काय प्रतिमा तयार होते, याचा सुद्धा विचार करावा.

 

दरम्यान, मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी म्हटले होते की, किशोरी पेडणेकर यांना एमआयएबरोबर (MIM) युती करायची आहे.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) आल्यामुळे पेडणेकर यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना पेडणेकर म्हणाल्या, कोणाचेही अस्तित्व कोणामुळे (Maharashtra Politics) धोक्यात येत नसते. तुमचे अस्तित्व धोक्यात होते,
म्हणून तुमच्या पक्षप्रमुखाला वेगळा पक्ष काढावा लागला. बाबासाहेबांनी सांगितले आहे, राज ठाकरेंचे षडयंत्र ओळखले होते. त्यामुळे त्यांना किती उत्तर द्यावे हा संशोधनाचा विषय आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | kishori pednekar attacks raj thackeray party mns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्‍यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

Keshav Upadhye | ‘वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!’ केशव उपाध्ये यांची टीका

Must Read
Related News