Maharashtra Congress | आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ईडी आणि सीबीआय चौकशी करा, काँग्रेसची मागणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राणा-कडू या दोन अपक्ष आमदारांनी राज्याचे राजकारण तापविले आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर गुवाहाटीला जाऊन 50 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर कडू यांनी संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या वादावर काँग्रेसने (Maharashtra Congress) भाष्य केले आहे. रवी राणांच्या (Ravi Rana) आरोपांची ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसने (Maharashtra Congress) केली आहे.

 

भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे गुवाहाटीला गेलेल्या आणि शिंदे यांच्या गटात सामिल झालेल्या सर्वांची ईडी (Enforcement Directorate) आणि सीबीआय (Central Bureau of Investigation) मार्फत चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Maharashtra Congress) कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

या प्रकरणी बोलताना अतुल लोंढे म्हणाले, राणांनी कडूंवर पैसे खाऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केला आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात अनेक आमदार 50 – 50 कोटी घेऊन गुवाहाटीला गेल्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरु होती. त्यावर रवी राणा यांनी शिक्कामोर्तब केले आहे. रवी राणा आमदार या संविधानिक पदावर असून, त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.

 

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह (Mumbai CP Param Bir Singh)
यांच्या एका पत्रावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)
यांच्यावर ईडी, सीबीआय आणि प्राप्तीकर (Income Tax) विभागांच्या चौकश्या झाल्या त्याचप्रमाणे
आता सत्तांतराच्या काळात कोणी कोणाला किती पैसे दिले, याची चौकशी झाली पाहिजे.
त्यामुळे राजकारण्यांचे खरे चेहरे लोकांसमोर येतील आणि सत्तांतराचे सत्य जनतेला कळेल.
तसेच जर का या संस्थांनी या आमदारांची चौकशी केली नाही, तर त्यांच्या नि:पक्षतेवर संशय येईल.

 

Web Title :- Maharashtra Congress | ed cbi investigate the allegations made by mla ravi rana who took how many boxes should come forward congress demands

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्‍यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

Keshav Upadhye | ‘वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!’ केशव उपाध्ये यांची टीका