Maharashtra Monsoon Session | ‘आधी होते खोके सरकार, आता आले बोके सरकार’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी (व्हिडिओ)

विरोधकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार गैरहजर, चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच (Maharashtra Monsoon Session) दिवशी काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी (Thackeray Group MLA) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन (Agitation) केले. यावेळी ‘आधी होते खोके सरकार, आता आले बोके सरकार’, ‘शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, लोकशाही विरोधी सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र, यावेळी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) गैरहजर होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आमदार गैरहजर राहण्याबाबत आमदार सचिन अहिर (MLA Sachin Ahir) यांनी भाष्य केलं आहे. सचिन अहिर म्हणाले, काही लोक नक्की आंदोलनाला आले होते. मात्र, आज पहिलाच दिवस असल्याने सर्वांची उपस्थिती नाही आहे. काहीजण येत आहेत. संयुक्तरितीने मंगळवारी सर्वजण आलेले दिसतील. पायऱ्यांपेक्षा सभागृहात काय भूमिका घेतली जाते, हे महत्त्वाचं आहे. आमदारांना एक-दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी लागेल. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ज्या मतदारांनी आमदारांना मतदान केलं आहे, त्यांनाही उत्तर द्यावे लागणार आहे.
नाहीतर आगामी काळात याच लोकांसमोर जात असताना तुमची भूमिका अशी का राहिली? असा जाब लोक विचारतील.
कारण, मतदारांच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल दृष्टीकोन बदलत चालला आहे.
हे चित्र स्थिर करायचे असेल, तर आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील, असेही सचिन अहिर म्हणाले.

Web Title :  Maharashtra Monsoon Session | sachin ahir on ncp not participant congress and shivsena ubt protest vidhanbhavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepika Padukone | स्टाईलिश एअरपोर्ट लुकसाठी दीपिका घेते खूप मेहनत; बॅगमध्ये आवर्जून ठेवते काही गोष्टी

Nupur Sanon | क्रिती सेनॉनची बहिण नुपूर सेनॉनही करणार बॉलीवुडमध्ये पदार्पण; ‘या’ बीग बजेट चित्रपटातून करणार दमदार एंट्री

Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्‍या ‘मजनू’ला दाखविली कोठडी

Parineeti Chopra And Raghav Chadha | परिणीती व राघव चड्ढा यांनी लग्नाआधी घेतला मोठा निर्णय

Siddharth Jadhav | लाखो रुपये कमवणाऱ्या सिद्धार्थ जाधवची ‘ही’ होती पहिली कमाई