Maharashtra NCP Political Crisis | मग त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत का?, जयंत पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

जयंत पाटलांची शरद पवारांसमोरच अमोल कोल्हेंना मोठी ऑफर
Maharashtra NCP Political Crisis | sharad pawar vs ajit pawar jayant patil slam Chhagan Bhujbal
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Political Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. अजित पवार गटाने आज एमईटीमध्ये बैठक घेतली. तर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याकडून वायबी चव्हाण सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil) यांनी बंडखोरांवर टीकास्त्र डागलं. तसेच विठ्ठलाच्या बाजूला बडवे असल्याची टीका करणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा चांगलाच समाचार घेतला. (Maharashtra NCP Political Crisis)

शरद पवार यांनी अनेकांना संधी दिली. विठ्ठलाच्या बाजूला बडवे आहेत असे छगन भुजबळ यांनी म्हटले. पण तुम्ही दोन वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले तेव्हा डोक्यावर पगडी ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? ज्यांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांचा अपमान केला, त्यांच्या मांडिला मांडी लावून बसले आहात. 2019 ला शरद पवार यांनी मंत्रिमंडळात (Cabinet) पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? असा सवाल करत जयंत पाटील यांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. (Maharashtra NCP Political Crisis)

अनेकांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला

जयंत पाटील पुढे म्हणाले, अनेकांनी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आज काही लोक बाजूला गेले, याचे आम्हाला शल्य आहे. शरद पवार साहेबांच्या उजवीकडे आणि डावीकडे बसलेले आज नाहीत. एक वर्ष झालं मुंबई शहराचा अध्यक्ष (Mumbai City President) नेमला नाही, का नेमला नाही? मुंबई प्रदेशच्या नेमणुका जयंत पाटील करत नाही. मला पाच वर्षे झालीत काही विधाने झाले, मी साहेबांना भेटलो आणि बोललो एकही सुट्टी घेतली नाही आता सुट्टी द्या… आता तुम्ही निर्णय घ्याल तो मान्य असेल. मी प्रदेशाध्यक्ष असताना फिरलो, मंत्री असताना मी मुंबईत बसून करु शकलो असतो, असंही जयंत पाटील म्हणाले.

शरद पवारांचा भारतात दरारा

शरद पवार साहेबांनी अनेक प्रसंगाला तोंड दिले आहे. संकट किती ही आली तरी त्याचा सामना केला. 10 जून 1999 ला आपला प्रवास सुरु झाला तो आता 24 वर्षाचा झाला आहे. पक्षाची चोरी करणाऱ्यांचा आज थयथयाट सुरु आहे. एका पक्षाची चोरी झाली, शिवसेनेबाबत (Shivsena) जे झाले ते राष्ट्रवादीच्या बाबतीत सुरु आहे. राज्यात राजकीय पटलावरुन नामशेष करण्याची भूमिका असेल तर सर्वांनी परत या. वय कितीही झालं तरी या नेत्याचा भारतात दरारा आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

अमोल कोल्हेंना ऑफर

अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांची व्हिडिओ क्लिप मी काल ऐकली. बापाला कधी विसरायचं नसतं, असं ते व्हिडिओमध्ये सांगत होते. बापाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या म्हणजे त्या कष्टाने आलेल्या असतात, याची सगळ्यांनाच जाणीव आहे. अमोल कोल्हे यांना माझी प्रदेशाध्यक्ष या नात्याने विनंती आहे, आपल्या पक्षाचं प्रचारप्रमुखपद आपण स्वीकारा. महाराष्ट्र पिंजून काढू, शिवरायांचा विचार सांगू, पुन्हा महाराष्ट्रात आपल्या विचारांचं सरकार आणू… अशी थेट ऑफर जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासमोर अमोल कोल्हे यांना दिली.

Web Title :  Maharashtra NCP Political Crisis | sharad pawar vs ajit pawar jayant patil slam Chhagan Bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Actress Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनयाबरोबरच करणार ‘या’ क्षेत्रात काम

Ajit Pawar | तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना