ऐतिहासिक ! महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच वडिल मुख्यमंत्री तर मुलगा कॅबिनेट मंत्री

मंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलगा आदित्य ठाकरे याला मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडीचे सरकार असून यामध्ये आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशाच्या राजकारणात पिता-पुत्राची पहिलीच जोडी नाही तर यापूर्वी दखील पिता-पुत्र एका सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत.

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी आघाडी करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (सोमवार) झाला. यामध्ये 36 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदासह 16 मंत्रीपद असणार आहेत. तर राष्ट्रवादीकडे 14 आणि काँग्रेसकडे 12 मंत्री असणार आहेत.

आश्चर्य़ाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री बनले आहेत तर उद्धव ठाकरे यांनी मुलगा आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एकाच मंत्रीमंडळात पिता-पुत्र मंत्री असल्याची राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

तामिळनाडू – करुणानिधि-स्टालिन यांची जोडी
देशात पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये मंत्रिमंडळात पिता-पुत्राची जोडी पहिल्यांदा पहायला मिळाली. तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात पिता-पुत्र एकाच वेळी मंत्री राहिले आहेत. तामिळनाडूत डिएमकेने 2006 मध्ये सरकार स्थापन केले. करुणानिधि यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले तर त्यांचा लहान मुलगा स्टालिन यांनी कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले.

पंजाब – बादल पिता-पुत्राची जोडी
पंजाब सरकारच्या इतिहासामध्ये पिता-पुत्राची जोडी एकाच मंत्रिमंडळात पहायला मिळाली. 2007 मध्ये अकाली दलने पंजाबमध्ये सरकार स्थापन केले. अकाली दलाचे प्रकाश सिंह बादल यांनी मुख्यमंत्री झाले. तर त्यांचे सुपुत्र सुखबीर सिंह बादल यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा अकाली दलाचे सरकार आले आणि यावेळी देखील या पिता-पुत्राची जोडी मंत्रिमंडळात पहायला मिळाली.

तेलंगना – केसीआर-केटीआर
तेलंगनामध्ये देखील पिता-पुत्राची जोडी पहायला मिळाली. 2014 मध्ये तेलंगना राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा घेण्यात आलेल्या निवडणुकीत टीआरएस यांचे सरकार आले आणि केसीआर हे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे चिरंजीव केटीआर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/