Maharashtra Police | दुर्देवी | चोरट्यांचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्यांचा पाठलाग (robbers Chase) करताना लातुर पोलिसांच्या (Maharashtra Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पोलीस कर्मचाऱ्याचा पडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना सोमवारी (दि.8) पहाटे साडे तीनच्या सुमारास लातूर शहरातील (Latur) लक्ष्मी कॉलनी भागात घडली. अहमदखान पठाण Ahmedkhan Pathan (वय-56 रा. लातूर) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पठाण हे स्थानिक गुन्हे शाखेत सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर (Maharashtra Police) कार्यरत होते.

 

अहमदखान पठाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील लक्ष्मी कॉलनी भागात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका घरात चोरटे घुसले होते. दरम्यान, याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथक घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी तीन चोरटे पळून जाता दिसले.

 

यावेळी चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी (Maharashtra Police) पाठलाग केला. पठाण हेही चोरट्यांच्या मागे धावत असताना अचानक ते जमिनीवर कोसळले. यावेळी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (SP nikhil pingle) यांनी दिली.

 

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे (LCB Police Inspector Gajanan Bhatalwande), पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी (Sunilkumar Pujari), पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर (Sudhakar Bawkar) यांनी भेट दिली.

 

पोलीस दलाकडून मानवंदना

अहमदखान पठाण यांच्या पार्थिवावर लातुरमधील कब्रस्थानमध्ये पोलीस दलाच्या
वतीने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
त्यानंतर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.
अंत्यविधीसाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.

 

Web Title :- Maharashtra Police | Latur police died while chasing robbers Shivajinagar Police Station of Latur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा