Maharashtra Police | ‘पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द’ – पोलीस महासंचालक रजनीश सेठ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | राजकीय तसेच सामाजिक आणि धार्मिक वातावरण तापले असताना आज साजऱ्या होणाऱ्या ईद सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) राज्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द (Police Leave Canceled) करण्यात आल्या असून 87 एसआरपीएफ (SRPF), 30 हजारांवर होमगार्ड (Homeguard) तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Director General of Police Rajnish Seth) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस महासंचालकांनी (DGP) पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्याचे म्हटले आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी बोलाताना डीजीपी रजनीश सेठ (IPS Rajnish Seth) म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था (Law and Order) हाताळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण घडामोडींवर वक्तव्यही केलं.

 

पोलीस महासंचालकांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्त (Aurangabad Police Commissioner) सक्षम आहेत.
ते कोणते गुन्हे लावयाचे, काय कारवाई करायची याचा अभ्यास करत आहेत.

कोणतीही जातीय तेढ निर्माण केली तर आम्ही त्यावर कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) केली आहे. नोटीसा दिल्या आहेत.
87 एसआरपीएफ (SRPF), 30 हजारावर होमगार्ड तैनात केले आहेत.
सर्व आयुक्तांना कायदा व सूव्यवस्था बिघडू नये यासाठी सूचना दिल्या आहेत.

15 हजार लोकांवर कारवाई केली आहे. 149 ची नोटीस 13 हजार लोकांना दिली आहे.
कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करणार

 

Web Title :- Maharashtra Police | maharashtra dgp ips rajnish seth says all leaves of police employees and officers cancelled in mumbai press conference

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा