Maharashtra Police | ICJS मधील ‘पोलीस सर्च’ वर्गवारीत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक; गृहमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृह मंत्रालय (Union Home Ministry) व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘Good Practices in CCTNS/ICJS 2021’ कॉन्फरन्स 16 आणि 17 डिसेंबर 2021 रोजी पार पडली होती. यावेळी Interoperable Criminal Justice System (ICJS) मधील Police Search या वर्गवारी मध्ये देशपातळीवर महाराष्ट्र (Maharashtra Police) राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक (Second prize) जाहीर करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वैयक्तीक उत्कृष्ट कामगिरी’बाबत पारितोषीक घोषीत करण्यात आले होते.

 

शुक्रवारी (दि.8) महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्स’ (Senior Officers Conference) मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार (Criminal Investigation Department (CID) Chief Ritesh Kumar), पोलीस अधीक्षक (तांत्रिक सेवा) संभाजी कदम (SP Sambhaji Kadam) यांना ट्रॉफी (Trophy) प्रदान करण्यात आली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) दैनंदिन कामकाजात गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंधक कारवाई, पासपोर्ट/चारित्र पडताळणी, वाहनांबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी, गुन्हेगारांचा कार्यपद्धी प्रमाणे शोध (MBO), शस्त्र परवाना इत्यादिसाठी CCTNS/ICJS या प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला. या प्रणालीच्या सहाय्याने महाराष्ट्र पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरीबाबत दुसरा क्रमांक पटकाविला. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद् नवी दिल्ली यांच्यकडून ICJS ची दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पोलीस महासंचाल कार्यालयास प्राप्त झाली होती.

ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार (ADG Riteish Kumar),
विशेष पोलीस निरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग मकरंद रानडे (IG Makrand Ranade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, तांत्रिक सेवा, संगणक विभाग संभाजी कदम, अपर पोलीस अधीक्षक नंदा पाराजे (Addl SP Nanda Paraje),
पोलीस उपअधीक्षक जितेंद्र कदम (DySP Jitendra Kadam), चंद्रशेखर सावंत (Chandrasekhar Sawant),
अर्चना पाटील (Archana Patil), अरविंद आल्हाट (Arvind Alhat) तसेच पोलीस निरीक्षक शशीकला काकरे (Police Inspector Shashikala Kakare),
जीवन मोहिते (Jeevan Mohite) यांनी ही कामगिरी केली.

 

Web Title :- Maharashtra Police | Maharashtra’s second prize in ‘Police Search’ category in ICJS; Presenting the trophy at the hands of the Home Minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray-Sharad Pawar | एसटी कामगारांच्या आंदोलनानंतर CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना ‘काॅल’

 

Sanjay Raut | ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत यांना दादरमधील फ्लॅट सोडावं लागणार का?; जाणून घ्या नियम काय सांगतोय?

 

Vasant More | माजी नगरसेवक वसंत मोरेंना अखेर राज ठाकरेंचा निरोप; ‘शिवतीर्थ’वर दिलं निमंत्रण