Maharashtra Police | राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल, सर्वच अप्पर महासंचालकांचं (ADG) ‘समाधान’ होणार !

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – नितीन पाटील –  Maharashtra Police | राज्य पोलिस दलात (Maharashtra Police) लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती गृहमंत्रालयातील सुत्रांनी ‘पोलीसनामा’ ऑनलाइनला दिली आहे. होणार्‍या फेरबदलामध्ये राज्यातील जवळपास सर्वच अप्पर पोलिस महासंचालकांची (जे ADG अनेक दिवसांपासुन अकार्यकारी पदावर कार्यरत आहेत असे) कार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासुन ‘अडगळी’च्या ठिकाणी नियुक्तीस असलेल्यांना ‘न्याय’ देण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे (director general of police sanjay pandey) यांनी त्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (home minister dilip walse patil) यांच्याकडे शिफारस केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, दोन-चार दिवसांपुर्वी याबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्याबैठकीत संबंधितांनी पोलिस महासंचालकांना त्याबाबत सुचवले असून त्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. ज्या आयपीएस (IPS) अधिकार्‍यांना आतापर्यंत स्वतंत्र कार्यभार (जिल्हा प्रमुख- superintendent of police) मिळालेला नाही त्यांची देखील जिल्हयाच्या प्रमुख पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

राज्यात अनेक विभागात (अकार्यकारी) अप्पर पोलिस महासंचालकांची (additional director general of police) नियुक्ती करण्यात येते.
गेले अनेक महिने आणि वर्ष काही अप्पर पोलिस महासंचालक अकार्यकारी पदावर कार्यरत आहेत.
त्यांच्या नियुक्त्यांकडे लक्ष वेधत अकार्यकारी पदावर कार्यरत असणार्‍या अप्पर पोलिस महासंचालकांची यादीच संबंधितांनी पोलिस महासंचालकांना सादर करण्यास सांगितली आहे.
पोस्टींगमध्ये वारंवार अन्याय झालेल्यांना अधिकार्‍यांना कार्यकारी पदावर काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
राज्यात अनेक अति वरिष्ठ अधिकारी कार्यकारी पदांपासून गेल्या अनेक दिवसांपासून
‘वंचित’ आहेत तर अनेक आयपीएस (IPS) अधिकारी हे देखील अकार्यकारी पदावर कार्यरत आहे.
अशांची यादीच तयारी करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काही आयपीएस तर अनेक महिन्यांपासून ‘वेटिंग’वर आहेत. त्यांना देखील आता
‘न्याय’ दिला जाणून असून त्यांची जिल्हा प्रमुख (पोलीस अधीक्षक- superintendent of police)
म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

 

बदल्या आणि पोस्टींगची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याबाबतचे आदेश लवकरच बाहेर पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बदल्यांवरून सरकारवर ‘निशाणा’ साधण्याचा काम वेळावेळी होत असल्याचं निदर्शनास असल्यानंतर पहिल्यांदाच बदली होणार्‍या अधिकार्‍यांची यादी तयार करून त्यांच्याकडून त्यांची इच्छा (चॉईस) विचारण्यात आली आहे.
सर्वच बदल्या या संबंधित अधिकार्‍यांच्या ‘इच्छे’नुसार होणे शक्य नसले तरी सर्वांनाच ‘न्याय’ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गेल्या काही वर्षापासून पोस्टींग देण्यात अन्याय झालेल्या संबंधित अधिकार्‍यांना त्यांच्या चॉईसनुसार पोस्टींग मिळेल असं पहावं अशी सूचना देखील उच्चपदस्थ बैठकीत देण्यात आली आहे.
त्या अनौपचारिक बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी ‘पोलीसनामा’ ऑनलाइनला दिली आहे.
होणार्‍या बदल्यांमध्ये जवळपास सर्वच्या सर्वच अप्पर पोलिस महासंचालकांचे ‘समाधान’ होईल, कोणीही नाराज होणार नाही असं कामाकज (ऑर्डर) काढण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

विशेष पोलिस महानिरीक्षकांचा देखील विचार

राज्यात काही ठिकाणी अप्पर पोलिस महासंचालकाची नियुक्ती होणे अपेक्षित असताना देखील संबंधित ठिकाणी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या (special inspector general of police) नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
त्याबाबत देखील विचार होणे गरजेचे आहे अशी शिफारस किंबहुना असा प्रस्तावच अति वरिष्ठ अधिकार्‍याने गृहमंत्र्याकडे सादर केल्याची माहिती मिळत आहे.
पोलिस महानिरीक्षक पदावर कार्यरत असणार्‍या अन् निवृत्तीच्या जवळ आलेल्या अधिकार्‍यांचा देखील कार्यकारी पदासाठी विचार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
आगामी काही दिवसांमध्येच (लवकरच) बदल्यांबाबतचे आदेश बाहेर पडणार आहेत.

कायद्याचं बोला… अलिकडील काळातील कामकाज

काही महिन्यांपुर्वी पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार संजय पांडे यांनी स्विकारला.
त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयातील कामकाज हे अत्यंत कायद्याचं अन् शिस्तप्रिय
चालू असल्याची भावना राज्यातील पोलिस कर्मचार्‍यांपासून ते वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांपर्यंत आहे.
त्यामुळे अल्पावधीतच पोलिस महासंचालक संजय पांडे (director general of police sanjay pandey) हे राज्य पोलिस दलात लोकप्रिय झाले आहेत.
सध्या बर्‍याच ठिकाणी पोलिस कर्मचारी देखील आता कायद्याचं बोला म्हणून शिस्तीमध्ये काम
करताना दिसत आहेत तर काही ठिकाणी पहिले पाढे 55…

 

Web Title :  Maharashtra Police | Major reshuffle in maharashtra police force, all Upper Director Generals (ADGs) will be satisfied !

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

MPSC | राज्य सेवा आयोगाची परिक्षेची नवी तारीख जाहीर; 4 सप्टेंबर रोजी होणार अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा

Gang Rape | कंडोमने सोडवली केस, फिल्मी स्टाइलमध्ये गजाआड केले गँगरेप आणि खूनातील आरोपी