Maharashtra Police | ‘वसुली’ प्रकरणात 2 ‘बड्या’ पोलिस अधिकार्‍यांना अटक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरार; राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | आयकर विभागाची (Income Tax Department) धमकी (Threat) देऊन अंगडियांना (Angadia) त्यांच्या व्यवसायात अडचणी आणत, पैसे वसुली (Money Recovery) करणाऱ्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील (Lokmanya Tilak Marg Police Station) 3 अधिकाऱ्यांविरुद्ध त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे (Police Inspector Om Wangate), सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम (API Nitin Kadam), पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे (PSI Samadhan Jamdade) यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिसांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणात गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (CIU) ने कदम आणि जमदाडे यांना अटक (Arrest) केली आहे. न्यायालयाने या दोघांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Police)

 

अंगडियांचे व्यवहार हे रोखीने चालत असून मुंबादेवी (Mumbadevi) परिसरात त्यांची अनेक कार्यालये आहेत. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व्यवसाय करु देत नसून चौकशीच्या नावाखाली त्रास देतात. तसेच रोखीच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला देण्याची धमकी देवून पैसे उकळत असल्याची तक्रार मुंबादेवी येथील अंगडिया असोसिएशनच्या (Angadia Association) वतीने पोलिसांकडे करण्यात आली होती. (Maharashtra Police)

 

या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Police Commissioner Hemant Nagarale) यांनी दिले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत (Addl CP Dilip Sawant) यांनी याबाबत अंगडिया तसेच पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्यासह पथकातील इतर पोलिसांची कसून चौकशी केली. मुंबादेवीच्या पोफळवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV), पोलीस डायरीमधील नोंदी (Police Diary Entry), पोलिसांचे जबाब यावरुन या अधिकाऱ्यांनी बेकायदा वसुली (Illegal Recovery) केल्याचे दिसून आले.

यावरुन दिलीप सावंत यांच्या तक्रारीवरुन हे अधिकारी कर्यारत असलेल्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी कदम आणि जमदाडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
त्या दोघांना न्यायालयाने 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक ओम वंगाटे फरार झाले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Police | mumbai-three-police-officers including PI, API and PSI booked for extorting money from angadias two of them arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI Term Deposit Scheme | एसबीआय स्कीमचा घ्या फायदा, 10 लाख डिपॉझिटवर मिळेल 3.14 लाख व्याज; सोबत टॅक्स सेव्हिंग

 

Narayan Rane | ‘दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता’; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

 

Maharashtra Unlock | नव्या व्हेरियंटमुळे टास्क फोर्सचा सावध पवित्रा, महाराष्ट्र अनलॉक करण्याचा निर्णय लांबणीवर