Maharashtra Police News | पेन्शनसाठी मानसिक त्रास, सेवानिवृत्त हवालदाराने उचललं टोकाचं पाऊल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी (Pension) मानसिक त्रास (Mental Distress) दिल्याच्या कारणावरुन सेवानिवृत्त पोलीस हवालदाराने (Retired Police Constable) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) खळबळजनक घटना सोलापूरमध्ये (Solapur Crime) घडली आहे. कल्याण गावसाने (Kalyan Gavasane) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

 

कल्याण गावसाने यांनी सोलापुरातील माशाळ वस्ती (Mashal Vasti) येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
गावसाने यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून (Nashik Central Jail) स्वेच्छा निवृत्ती (Voluntary Retirement) घेतली होती.
सेवा निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी कारागृह प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप गावसाने यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

 

कल्याण गावसाने यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्यांना पेन्शनसाठी त्रास दिला जात होता.
यामुळे या आत्महत्येला नाशिक मध्यवर्ती कारागृहातील आवारे मॅडम (Aware Madam)
आणि गायकवाड (Gaikwad) यांच्यावरती गुन्हा (FIR) दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावसाने यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला दिला आहे.

 

Web Title :- Maharashtra Police News | Retired Police Havaldar ended his life due to mental stress for pension Solapur Police Maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा