Maharashtra Police News | आरोपींनी पोलिसांवर रोखलं पिस्टल; स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार

जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | जामखेड शहरातील तपनेश्वर येथे कारचालकाच्या डोक्याला पिस्टल (Pistol) लावून कार पळवली. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे (Jamkhed Police Station) पोलीस निरीक्षक महेश पाटील (PI Mahesh Patil) व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. खर्डा रोडवरील एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले. दरम्यान आरोपींनी पोलिसांवर पिस्टल रोखली. (Jamkhed Crime News) स्वसंरक्षणासाठी (Self-Defense) पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीच्या पायावर गोळीबार (Police Fired Accused) केला. यानंतर तिनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Police News)

पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांचे सहकारी आरोपींना ताब्यात घेत असताना आरोपींसोबत झटापट झाली. याच दरम्यान एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या पायावर (Feet) गोळीबार करुन तीनही आरोपींना ताब्यात घेतले. जखमी झालेल्या आरोपीवर नगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. (Maharashtra Police News)

याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable)
संतोष नामदेव कोपनर (Santosh Namdev Kopner) यांनी फिर्याद दिली आहे.
बुधवारी (दि.19) मध्यरात्री 12.10 च्या सुमारास आरोपी प्रताप उर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुचे
(सर्व रा. सारोळा, ता. जामखेड) यांनी शहरातील तपनेश्वर रोड (Tapaneshwar Road) येथे अदनान जर शेख (रा. तपनेश्वर रोड, जामखेड)
यांच्या डोक्याला पिस्टल लावले. शेख यांच्या ताब्यातील अर्टिगा गाडी (एमएच 12 केटी 4795) चोरी केली.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात आयपीसी 307, 353, 332, 34 तसेच आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Web Title : Maharashtra Police News | The accused held the pistol at the police; A police inspector fired at the feet of the accused in self-defence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)