Maharashtra Police Uniform | पोलिस उप अधिक्षक ते उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक गणवेशापासून सुटका, DGP संजय पांडे यांनी काढले आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Uniform | महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता ट्युनिक गणवेश (Tunic Uniform) वापरणे अडचणीचे व आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याचा अभिप्राय घटक प्रमुखांकडून प्राप्त झाला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख (Maharashtra Police Uniform) पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी बुधवारी (दि.2) याबाबतचे नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक (DySP) ते पोलीस उपनिरीक्षक (PSI) या दर्जाच्या अधिकाऱ्यांना ट्युनिक गणवेश परिधान करणे बंद करण्यात आले आहे.

 

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस नियमावली 7 मधील नियमानुसार 211 ते 213 नुसार उप अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी असलेला ट्युनिक गणवेश परिधान करणे बंद करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील (Maharashtra Police Uniform) पोलीस अधिकारी यांनी समारंभ, परेड, ध्वजवंदना दरम्यान दररोजच्या कामासाठी घालण्यात येणाऱ्या गणवेशावर (वर्कींग पोषाख) क्रॉस बेल्ट व तलवार धारण करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

पोलिसांचा ट्युनिक गणवेश कसा असतो
खाकी रंगाचा फुल भायाचा ब्लेझर
त्याच्या आतून अंगात अगोदर फुल खाकी भायाचा शर्ट
गळ्यात टाय किंवा स्कार्प
ब्ल्यू कॅप

 

Web Title :- Maharashtra Police Uniform | DGP Sanjay Pandey orders release of Deputy Superintendent of Police (DSP) to Police Sub Inspector (PSI) from Tunic uniforms

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा