आरोग्यताज्या बातम्या

Kidney Health | किडनी निरोगी ठेवण्यासाठी स्वामी रामदेव यांनी सांगितलेल्या टिप्स करा फॉलो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Health | किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपल्या शरीरात निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ गाळून ते मूत्रमार्गाद्वारे बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम किडनीमार्फत केले जाते. शरीरात किडनीचे कार्य बिघडले तर आपण अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतो. किडनीने काम करणे बंद केले तर व्यक्तीचा जीव जातो. अशा स्थितीत, मूत्रपिंडाशी संबंधित कोणतीही समस्या सहजपणे न घेता त्यावर योग्य उपचार करणे खूप महत्वाचे आहे. (Kidney Health)

 

आजच्या धावपळीच्या जगात बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक किडनीशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. किडनीशी संबंधित आजारांमुळे शरीरात काही लक्षणे दिसू लागतात जसे की शरीरात उर्जेची कमतरता, थकवा, एकाग्रता नसणे, लघवीला त्रास होणे, किडनीमध्ये तीव्र वेदना इ. अनेक लोक किडनी निरोगी ठेवण्यासाठी अ‍ॅलोपॅथी उपचार घेण्याऐवजी आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात.

 

तुम्हीही अ‍ॅलोपॅथीऐवजी आयुर्वेद किंवा घरगुती उपचारांना महत्त्व देत असाल तर आज आम्ही तुम्हाला किडनी निरोगी ठेवण्यासाठी स्वामी रामदेव यांनी दिलेल्या टिप्सची माहिती देणार आहोत. (Kidney Health)

किडनी निरोगी ठेवण्याचे मार्ग

1. स्वामी रामदेव यांच्या मते, किडनी निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी उडीद डाळ खाणे आवश्यक आहे.

2. गोखरूचे पाणी घरातील सर्व सदस्यांनी महिन्यातून एकदा प्यावे, त्यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधित आजार होत नाहीत.

3. क्रिएटिनीन लेव्हल वाढणे, किडनी लिकेज होणे, या सर्व आजारांमध्ये गोखरू खूप फायदेशीर आहे.

4. रात्री मूठभर जव, मूठभर कुळीथ चार कप पाण्यात भिजत ठेवा. यानंतर दुसर्‍या दिवशी शिजवून घ्या आणि एक चतुर्थांश शिल्लक राहिल्यावर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी घ्या.

 

(साभार : स्वामी रामदेव)

 

Web Title :-  Kidney Health | kidney health swami ramdev ayurveda treatment for kidney

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aditya Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर

 

Anil Deshmukh | ‘या’ कारणामुळं गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ED च्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुखांचा जबाब

 

Gajanan Babar Passes Away | पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखा सुरु करणारे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन; 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Back to top button