Maharashtra Political Crisis | ED कडून संजय राऊतांची झाडाझडती; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले – ‘जेलमध्ये…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या घरी ED ची टीम आज सकाळीच पोहचली आहे. येथे ईडीची शोधमोहिम आणि चौकशी सुरू आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसते. राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त असून शिवसैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणात जमू लागले आहेत. मात्र राऊत यांच्या घरात कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnaivs) यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

ईडीच्या कारवाई प्रकरणी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे नाव न घेता आमदार एकनाथ खडसे म्हणाले, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न होतोय. मला जेलमध्ये टाकल्यावर यांच्यासाठी रान मोकळे होईल. भोसरी जमीन गैरव्यवहारासंदर्भातील (Bhosari Land Scam) चौकशी आता लाचलुचपत विभागाकडे देण्यात आल्यासंदर्भात खडसेंनी हे भाष्य केले. (Maharashtra Political Crisis)

खडसे म्हणाले, भोसरीतील भूखंडाची चौकशी अनेक वेळा झाली. झोटिंग समितीने चौकशी केली. पुण्याच्या लाचलुचपत विभागाचे चौकशी करून कुठलाही दोष नाही, कुठलाही भ्रष्टाचार नाही, अनियमितता नाही म्हणून हा एफआयआर रद्द करावा, यासाठी पुणे सत्र न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट दीड महिन्यापूर्वी दिला आहे. नाशिक लाचलुचपत विभागाने सुद्धा यात तथ्य नाही, असा अहवाल दिला आहे. आता ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे.

 

मला छळण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत एकनाथ खडसे म्हणाले, ईडीच्या माध्यमातून मला अडचणीत आणण्याचा, छळण्याचा प्रयत्न होत आहे.
आतापर्यंतच्या चौकशींमध्ये निर्दोष निघालो आहे. तरीही पुन्हा चौकशांच्या माध्यमातून मला अडकवले जात आहे.
कोणतीही चौकशी झाली तरी मला विश्वास आहे की त्यात कुठलेही तथ्य नसेल.
तरीही नव्याने चौकशी करून खोट्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न झाला तर सांगता येत नाही.
कितीही चौकशा केल्या तरी मी निर्दोष सुटेन.

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | after ed action on shiv sena leader sanjay raut ncp eknath khadse blames bjp over acb action on him

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा